सांताक्रुझमधून पावणेसहा लाखांचा गुटखा हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:36 IST2019-08-20T13:34:20+5:302019-08-20T13:36:49+5:30
ही कारवाई रविवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने केली.

सांताक्रुझमधून पावणेसहा लाखांचा गुटखा हस्तगत
मुंबई - सांताक्रुझ परिसरात छापा मारत लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ८ ने केली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांताक्रुझ पूर्वच्या प्रभात कॉलनीतील गुरुनानक चाळीत गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती कक्ष ८ ला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश तोगरवड आणि पथकाने या परिसरात छापा मारला आणि तेथून ५ लाख ८६ हजार ५५० रुपयांचा गुटखा हस्तगत केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांचाही या कारवाईमध्ये समावेश होता. या प्रकरणी एकाला ताब्यात घेत त्याला पुढील चौकशीसाठी वाकोला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.