शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लॅब टेक्निशियनला न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 05:46 IST

१५ जणांचे जबाब नोंदविले; चारकाेप बनावट कोरोना चाचणी अहवाल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वॅब न तपासताच केवळ लक्षणे विचारून थेट काेराेना निगेटिव्ह अहवाल देऊन मोकळ्या होणाऱ्या मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९) या लॅब टेक्निशियनला चारकोप पोलिसांनी अटक केली होती. त्याला १५ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली असून, याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले.

उमरने ३७ लोकांकडून १ हजार रुपये घेऊन स्वॅब न घेताच कोरोना निगेटिव्ह अहवाल दिला होता. त्यानुसार या लोकांचा शोध घेत जबाब देण्यास बोलावले. आतापर्यंत १५ जणांनी जबाब नोंदविल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने अन्य लोकांनी पोलीस ठाण्यात येण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ज्यांचे जबाब नोंदविले आहेत त्यात कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झालेले नाही. उमरने ज्यांना काेराेना निगेटिव्ह अहवाल दिला, त्यापैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळते का, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत, तर उमर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचेही चारकोप पोलिसांनी सांगितले.

थायरोकेअर लॅबसाठी काम करणाऱ्या व मालवणीच्या गेट क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या उमरविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार तिला देण्यात आलेल्या कोरोना अहवालाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेगळ्याच रुग्णाची माहिती त्यात उघड झाली, असे तिचे म्हणणे होते. त्यानुसार तपासाअंती चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून उमरची चौकशी सुरू केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

...अशी झाली अटकएका महिलेने तिला दिलेल्या कोरोना अहवालाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेगळ्याच रुग्णाची माहिती उघड झाली. त्यामुळे तिने पाेलिसांत तक्रार केली आणि उमरचे बिंग फुटले. उमरने ज्यांना काेराेना निगेटिव्ह अहवाल दिला, त्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आहे का, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस