शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

दोन किलो सोनं अंडरविअरमध्ये लपवून तस्करीचा प्रयत्न, कोलकात्याच्या विद्यार्थिनीला लखनौमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 8:36 PM

कस्टम विभागाच्या उपायुक्त निहारिका लाखा यांनी सांगितले, की कोलकात्यात राहणारी 22 वर्षिय विद्यार्थिन 2.3 किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होती.

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे कोलकात्यातील एका विद्यार्थिनीला अटक करण्यात अली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, तिच्यावर 1 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करिचा आरोप ठेवण्यात आला आहे. ती 13 एप्रिलला इंडिगोच्या विमानाने दुबईहून लखनौला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीने जवळपास 2 किलो सोने आपल्या अंडरविअरमध्ये लपवले होते. (Kolkata student smuggling gold of more than 1 crore arrested in lucknow UP)

कस्टम विभागाच्या उपायुक्त निहारिका लाखा यांनी सांगितले, की कोलकात्यात राहणारी 22 वर्षिय विद्यार्थिन 2.3 किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होती. तिने सोन्याचे बिस्किट्स पांढऱ्या पॉलिथीनमध्ये ठेऊन आपल्या अंडरविअरमध्ये लपून ठेवले होते. सोन्याची किंमत 1.13 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थिनीचे वडील तांदळाचे ठोक व्यापारी आहेत. 

'एका महिला प्रवाशाकडून तस्करीचे सोने हस्तगत होणे एक मोठे यश आहे. या विद्यार्थिनीला दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले होते. यानंतर तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, असे निहारिका लाखा यांनी सांगितले.

या विद्यार्थिनीला पहिल्यांदा लखनौ येथे अटक करण्यात आली होती. ती विमानतळाबाहेर वाट पाहत असलेल्या एका व्यक्तीला सोने सोपवणार होती, अशी पुष्टी सीमा शुल्क अधिकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSmugglingतस्करीwest bengalपश्चिम बंगालUttar Pradeshउत्तर प्रदेश