'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:28 IST2025-06-27T16:27:52+5:302025-06-27T16:28:21+5:30

Kolkata Rape Case: कोलकात्यात वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Kolkata Rape Case: 'They dragged me to a room and raped me...', Kolkata rape victim tells incident | 'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती

'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती

Kolkata Rape Case: गेल्यावर्षी कोलकाता येथील आरजी कर मेडिक कॉलेजमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्या प्रकरणाच्या वर्षभरानंतर आता आणखी एक घटना घडली आहे. कोलकाता लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि इतर सध्याचे विद्यार्थी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षी पीडित विद्यार्थिनी २५ जून रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती. यादरम्यान, कॅम्पसमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेच्या तक्रारीवरुन दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१) आहे, जो कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या (टीएमसीपी) युनिटचा अध्यक्ष आहे. याशिवाय, सह-आरोपींमध्ये जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांचा समावेश आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे न्यायालयाने तिन्ही आरोपींना पुढील मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडितेने सांगितली आपबीती...
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, "आरोपींनी मला ओढत एका रुममध्ये नेले आणि जबरदस्ती केली. मी नकार दिला, खूप विरोध केला, पण त्यांनी काहीही ऐकले नाही. ते माझ्यावर जबरदस्ती करत होते, तेव्हा मला पॅनिक अटॅक आला. मी त्यांना सांगितले की, मला श्वास घेण्यास त्रास होतोय, रुग्णालयात घेऊन जा, पण त्यांनी काहीच ऐकले नाही. घटनेनंतर त्यांनी माझ्या मित्राला मारण्याची आणि माझ्या पालकांना अटक करण्याची धमकी दिली. जेव्हा आरोपी बलात्कार करत होता, तेव्हा त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. मी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांनी मला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला," अशी माहिती पीडितेने दिली.
 

 

Web Title: Kolkata Rape Case: 'They dragged me to a room and raped me...', Kolkata rape victim tells incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.