कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या; क्षुल्लक भांडणाने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:22 PM2021-09-05T19:22:47+5:302021-09-05T19:23:39+5:30

Murder Case : सफाळे येथील सरू पाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत असत. दारू प्यायल्यानंतर ह्या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणे होत असे.

Killed his friend in front of his wife with an axe; The life taken by a trivial quarrel | कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या; क्षुल्लक भांडणाने घेतला जीव

कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या; क्षुल्लक भांडणाने घेतला जीव

Next
ठळक मुद्देफरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून अटक करण्यात यश मिळविले.

पालघर - सफाळे येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा ह्या 19 वर्षीय आरोपीने आपला मित्र धिरज राम प्रसाद गौड(वय 24 वर्ष)ह्याचा त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून अटक करण्यात यश मिळविले.

     

सफाळे येथील सरू पाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत असत. दारू प्यायल्यानंतर ह्या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणे होत असे. शनिवारी संध्याकाळी  7.30 वाजण्याच्या सुमारास सफाळेमध्ये एका दुकानासमोर त्यांचे दोघांचे भांडण झाले. ह्यावेळी आरोपी आपल्या हातात कोयता घेऊन आल्या नंतर उपस्थित काही लोकांनी त्यांचे भांडण मिटविले. नंतर मयत आपल्या घरी निघून गेला.काही वेळा नंतर हातात कुऱ्हाड घेऊन आरोपी मयत धिरज ह्याच्या घरी आला.आणि झोपलेल्या धिरज च्या डोक्यात त्याच्या पत्नीच्या समोरच कुऱ्हाड घातली.रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या आपल्या मित्राला पाहून भानावर आलेल्या आरोपीने पळ काढला.सफाळे पोलीस ठाण्याचे सपोनि संदिप कहाळे ह्यांना ह्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.रविवारी पहाटे लोकल पकडून डहाणू येथील एका आदिवासी पाड्यात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले.मयत धिरज ह्याला उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टराणी त्याला मृत घोषित केले.आरोपी विरोधात सफाळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सफाळे पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती सपोनि कहाळे ह्यांनी दिली.

Web Title: Killed his friend in front of his wife with an axe; The life taken by a trivial quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.