मित्राची हत्या करून रचला रेल्वे अपघाताचा बनाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 09:24 PM2018-08-30T21:24:19+5:302018-08-30T21:25:04+5:30

समलैंगिक संबध उघडकीस आणण्याची धमकी देणाऱ्या साथीदाराची हत्या 

killed a friend and created drama by showed like railway accident | मित्राची हत्या करून रचला रेल्वे अपघाताचा बनाव 

मित्राची हत्या करून रचला रेल्वे अपघाताचा बनाव 

googlenewsNext

मुंबई - उधार घेतलेले पैसे न दिल्यास समलैगिक संबध चव्हाट्यावर आणण्याची धमकी देणाऱ्या साथीदाराची निर्घुण हत्या करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला बोरिवली रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. सलीमअली मुन्ना अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर रेल्वे अपघातात साथीदाराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता. 

मूळचे उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील राहणारे असलेले सलीमअली आणि त्याचा साथीदार ज्ञानेश्वर (बदललेले नाव) हे मालाडच्या शुक्ला डेअरी/तबेला येथे कामाला होते. यादरम्यान दोघांमध्ये समलैंगिक संबध होते. काही दिवसांपूर्वी सलीमअलीने ज्ञानेश्वरकडून २६ हजार रुपये उसन्या स्वरूपात घेतले होते. ज्ञानेश्वरला पैशांची गरज असल्यामुळे त्याने सलीमअलीजवळ पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र, पैसे देण्यास सलीम हा टाळाटाळ करत होता. त्यावरूनच ज्ञानेश्वरने सलीमअलीला दोघांमध्ये असलेले समलैंगिक संबध सर्वांना सांगून बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे समाजात बदनामी होण्याच्या भीतीने सलीमअलीने मद्यपान केल्यानंतर ज्ञानेश्वरचा तोल जातो याच संधीचा फायदा घेऊन त्याचा काटा काढण्याचा सलीमअलीचा डाव होता.  

मालाड रेल्वे स्थानकाजवळील हाजीबापू रोडवरील वाईन शाॅपजवळ ज्ञानेश्वरला बोलवून घेतले. त्यानंतर दोघेही रेल्वे रूळालगत दारू पिण्यासाठी बसले. दोघांनीही मद्यपान केल्यानंतर ज्ञानेश्वरचा तोल जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सलीमअलीने ज्ञानेश्वरला त्याच्याच लुंगीने बांधले. सलीमअली मारहाण करताना ज्ञानेश्वर आरडा ओरडा करेल या भीतीने सलीमअलीने त्याची लुंगी फाडून तो कपडा ज्ञानेश्वरच्या तोंडांत कोंबून चाकून ज्ञानेश्वरचा गळ्यावर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली. तसेच त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून अपघातात ज्ञानेश्वरचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन अहवालात ज्ञानेशवरचा अपघातात मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी कारवाईस सुरूवात केली. घटनास्थळावरील शेकडो सीसीटिव्ही तपासले. मात्र, आरोपीची ओळख पटत नव्हती. ज्ञानेश्वरच्या शवविच्छेदनात त्याने मद्यपान केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलीसांनी परिसरातील सर्व बार आणि वाॅईन शाॅपचे सीसीटिव्ही तपासले. त्यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या सलीमअलीची पोलीसांना ओळख पटली. सलीमअलीला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबूली दिली.

Web Title: killed a friend and created drama by showed like railway accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.