शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून जीवघेणा हल्ला : वर्चस्ववादातून घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 11:57 IST

आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती.

ठळक मुद्देहडपसरमध्ये घडला़ प्रकार : चौघांना अटक

पुणे: वर्चस्ववादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तिघांना कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार हडपसरमध्ये घडला़. त्यांच्यातील एकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्यावर बोपदेव घाटात सोडून दिले होते़.  याप्रकरणी हडपसरपोलिसांनी अमर काशीनाथ शिंगे (वय २०),मलक्काप्पा आण्णाराव बनसोडे (वय २२, दोघेही रा़ होळकरवाडी), अशोक भरेकर (वय २७, रा. हांडेवाडी चौक), शांताराम काळे (वय २०, रा. तुकाई दर्शन) या चौघांना अटक केली आहे़. त्याचे अन्य साथीदार फरार आहेत़ याप्रकरणी रोहित जगताप (वय २४, रा़ भेकराईनगर फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे़. हा प्रकार हडपसरमधील हांडेवाडी चौकाजवळ १५ जूनला रात्री साडेअकरा वाजता घडला़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे असून, मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  जगताप हे त्यांच्या इतर दोन मित्रांसह याच परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यानंतर ते त्यांच्या एका मित्राला सोडण्यासाठी हांडेवाडी चौकात आले. दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या स्कोडा गाडी व रिक्षातून सात ते आठ जण खाली उतरले व त्यांनी जगताप यांची दुचाकी अडवली. त्यामध्ये जगताप यांच्या ओळखीचा सागर अवताडे हा कोयता घेऊन  होता. त्यानंतर जगताप यांचा मित्र नारायण पुरी याला गाडीवरुन खाली ओढण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तेव्हा जगताप त्याला सोडविण्यास गेले़ त्यावेळी औताडे याने जगताप यांच्यासह त्यांचा दुसरा मित्र सलीम तांबोळी याला लाकडी दांडक्याने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. तसेच जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देत  पुरी याला बळजबरीने गाडीत घालून घेऊन गेले. त्यानंतर जगतापने झालेल्या प्रकाराची माहिती शंभर नंबरला कॉल करुन पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शिंदे याला अटक केली. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर सहायक निरीक्षक संजय चव्हाण  यांनी आपल्या पथकासह तेथे धाव घेतली़ मात्र, अपहरण केलेल्या तरुणाचा शोध काही लागत नव्हता. शेवटी पुरीकडे असलेल्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन काढले़ तेव्हा ते बोपदेव घाटाच्या परिसरात आढळून आले. त्यानुसार त्याचा शोध घेतला तेव्हा मिळून आला. आरोपींनी बेदम मारहाण केल्यामुळे पुरी गंभीर जखमी असून, त्याला  उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKidnappingअपहरण