'मुली आम्हाला माफ कर': 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार अन् हत्या; गोणीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 16:09 IST2023-07-30T16:08:33+5:302023-07-30T16:09:12+5:30

मुलीला शोधण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट लिहून माफी मागितली.

kerala-news-5-year-old-girl-raped-and-killed-in-Ernakulam-body-found-in-sack-accused-arrested | 'मुली आम्हाला माफ कर': 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार अन् हत्या; गोणीत सापडला मृतदेह

'मुली आम्हाला माफ कर': 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार अन् हत्या; गोणीत सापडला मृतदेह

एर्नाकुलम: केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्यानंतर गळा दाबून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर केरळपोलिसांनी शनिवारी सोशल मीडियावर माफीनामा पोस्ट केला. ट्विटरवर पोस्ट केलेल्या माफीनाम्यात, केरळ पोलिसांनी या जघन्य गुन्ह्यात बळी पडलेल्या मुलाची माफी मागितली आहे.

शुक्रवारी रात्री पाच वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान अलुवा येथील स्थानिक बाजारपेठेमागील दलदलीत एका गोणीत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर आधी बलात्कार आणि नंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मल्याळम भाषेत लिहिलेल्या पोस्टमध्ये केरळ पोलिसांनी म्हटले की, 'आम्हाला माफ कर मुली. मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांकडे परत आणण्याचे त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.' दरम्यान, ही मुलगी बिहारमधील एका स्थलांतरीत दाम्पत्याची मुलगी होती. तिच्यावर बलात्कार आणि खुन करणाऱ्या आरोपीला एका दिवसानंतर अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी मजुराला बिहारमधून अटक केली आहे. मुलगी आपल्या पालकांसह ज्या इमारतीत राहत होती, त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत तो राहत होता. 
 

 

Web Title: kerala-news-5-year-old-girl-raped-and-killed-in-Ernakulam-body-found-in-sack-accused-arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.