शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लेकीला फाशी द्या म्हणणारी आहे मुस्कानची सावत्र आई; पालकांच्या बँक खात्यातून समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:22 IST

सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कानच्या आईबद्दलही पोलिसांना तपासात नवीन माहिती मिळाली आहे.

मेरठच्या सौरभ हत्याकांडात आता नवीन खुलासे होत आहेत. सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कानच्या आईबद्दलही पोलिसांना तपासात नवीन माहिती मिळाली आहे. आपल्या खुनी मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी आणि रडत माध्यमांसमोर आलेली कविता रस्तोगी ही मुस्कानची सावत्र आई आहे. सौरभच्या कुटुंबाने मुस्कानच्या कुटुंबावर पैशांबाबत केलेल्या सर्व आरोपांची चौकशी सुरू झाली आहे.

मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात सौरभकडे सुमारे ६ लाख रुपये असल्याचं समोर आलं, त्यापैकी १ लाख रुपये मुस्कानच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे मुस्कानच्या आईच्या खात्यातही पैसे पाठवण्यात आले. यापूर्वी कधी आणि किती पैसे पाठवले गेले आणि हे पैसे कुठे वापरले गेले यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

एसपी सिटी आयुष विक्रम म्हणाले की, मुस्कान आणि सौरभला रिमांडवर घेतलं जाईल. आरोपपत्र दाखल करण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत. पुरावे गोळा केले जात आहेत. चौकशी सुरू आहे. सर्व काही चिन्हांकित केलं आहे. हे दोघेही मेरठच्या बाहेर कधी आणि कुठे गेले आणि शिमलामध्ये कुठे गेले याची माहितीही गोळा केली जात आहे. त्याच्या फोनची चौकशी सुरू आहे. ही हत्या पूर्ण नियोजनाने करण्यात आली होती. मुस्कान आणि साहिल यांनीही दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला.

सौरभच्या भावाने केले गंभीर आरोप 

सौरभचा भाऊ बबलू म्हणाला की, सौरभ लंडनहून लाखो पाऊंड घेऊन आला होता. सौरभने मुस्कानच्या कुटुंबाच्या खात्यात पैसे जमा केले होते, ज्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.मुस्कानच्या कुटुंबाने सौरभच्या पैशांनी घर खरेदी केलं आहे. सौरभच्या पैशांनी आयफोनही खरेदी केला होता. आम्ही साहिलला ओळखत नाही. मी पहिल्यांदाच त्याचा चेहरा पाहिला.

मुस्कान हिरोईन बनण्यासाठी पळून गेली

सौरभ लंडनला जाण्यापूर्वी मुस्कान कोणासोबत तरी पळून गेली होती. मुस्कान हिरोईन बनण्यासाठी पळून गेली होती. यानंतर आम्ही सौरभकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पण घटस्फोट होऊ शकला नाही. बबलूचा दावा आहे की, मुस्कानचे पालकही या संपूर्ण हत्येत सहभागी असू शकतात. मुस्कानच्या घरी खाण्यापिण्याचे वांदे आहेत. मुस्कानचे वडील पूर्वी एका ज्वेलर्सकडे काम करायचे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस