'याला संपवून टाक, सोडू नको'; पतीला संपवण्यासाठी पत्नीचा मोठा कट, कुलरला पाय लागला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:08 IST2025-09-10T12:05:11+5:302025-09-10T12:08:16+5:30

कर्नाटकात पतीची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

Karnataka wife along with her lover attacked her husband | 'याला संपवून टाक, सोडू नको'; पतीला संपवण्यासाठी पत्नीचा मोठा कट, कुलरला पाय लागला अन्...

'याला संपवून टाक, सोडू नको'; पतीला संपवण्यासाठी पत्नीचा मोठा कट, कुलरला पाय लागला अन्...

Karnataka Crime: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीला मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेला काही करुन तिच्या पतीला संपवायचे होते. यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली होती. मात्र तिचा हा प्रयत्न फसला आणि तिच्या पतीचे प्राण वाचले. यानंतर पोलिसांनी हा भयंकर कट रचणाऱ्या पत्नीला अटक करत तपास सुरु केला आहे.

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरात ही सगळी धक्कादायक घटना घडली. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचत मध्यरात्री त्याचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. पण कूलरचा आवाज आणि घरमालकाच्या सतर्कतेमुळे पतीचा जीव वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पत्नी सुनंदा पुजारीला अटक केली आहे, तर तिचा प्रियकर सिद्धप्पा कटनकेरी फरार आहे.

१ सप्टेंबरच्या मध्यरात्री बिरप्पा पुजारी नावाची व्यक्ती अक्कमहादेवी नगरमधील एका भाड्याच्या घरात शांत झोपली होती. अचानक त्याला जाग आली तेव्हा त्याच्यासमोर त्याचा मृत्यू उभा होता. एक माणूस बिरप्पाच्या छातीवर बसला होता आणि त्याचा गळा दाबत होता. दुसरा जण त्याच्या पायावर बसून त्याच्यावर गुप्तांगावर हल्ला करत होता. बिरप्पाने डोळे उघडले तेव्हा त्याला लाईट बंद असल्याच्या दिसल्या अंधारात तो श्वास घेण्यासाठी सर्व ताकद लावून  झगडत होता. त्यावेळी त्याचा पाय कूलरवर आदळला आणि एक मोठा आवाज आला.

तितक्यात बिरप्पाला त्याची पत्नी सुनंदाचा आवाज आला. ती तिच्या प्रियकराला, याला संपवून टाक, सोडू नकोस सिद्धू असे म्हणत असल्याचे बिरप्पाने ऐकले आणि त्याला जबर धक्का बसला. तितक्यात घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी यांनी आवाज ऐकला आणि ते घराबाहेर आले. त्यांनी दार वाजवायला सुरुवात केली. बिरप्पाचा मुलगा राकेशने रडत दार उघडले. त्यानंतर सुनंदा धावत बाहेर आली आणि घरमालकाला आत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांना ढकलून दिले. तेव्हा बिरप्पाला दिसले की त्याचा गळा दाबणारा व्यक्ती सिद्धप्पा कटनाकेरी होता.

सिद्धप्पामुळेच त्यांच्या घरात वारंवार भांडणे होत होती. त्याच्यासोबत आणखी एक पुरूष होता ज्याचा चेहरा कापडाने झाकलेला होता. पळून जाताना हल्लेखोरांनी बिरप्पा धमकी दिली की,"हरामखोर यावेळी वाचलास, पुढच्या वेळी आम्ही तुला मारून टाकू." या हल्ल्यात बिरप्पा गंभीर जखमी झाला आणि त्याच्या मानेला आणि गुप्तांगांना दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान,बिरप्पा  पोलिसांना सांगितले की, त्यांनी मध्यरात्री माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझा गळा दाबला, माझे नाक आणि तोंड दाबले. मी श्वास घेऊ शकत नव्हतो. मग मी कूलर मारली. माझी पत्नी जवळच होती, पण तिला काहीही केले नाही. उलट ती म्हणत होती की त्यांनी मला मारून टाकतील. दुसरीकडे, सिद्धप्पाने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्याने, "सुनंदा आणि मी अडीच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुनंदाला अटक केली आहे, तर सिद्धप्पा फरार आहे. 

Web Title: Karnataka wife along with her lover attacked her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.