आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:08 IST2025-08-17T18:08:29+5:302025-08-17T18:08:59+5:30
Karnataka Crime: आरोपी मृत तरुणाचे जीवलग मित्र होते; हत्येनंतर तिघांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
Karnataka Crime: कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पत्नी आणि आईसमोर त्याच्याच तीन मित्रांनी निर्घृण हत्या केली. मृताचे नाव विनय देवाडिगा (३५) असे आहे. हत्येनंतर आरोपींनी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अजित (२८), अक्षेंद्र (३४) आणि प्रदीप आचार्य अशी आरोपींची नावे आहेत.
व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
हत्येचे प्रकरण जिल्ह्यातील पुत्तूर गावतील आहे. मृत विनय देवाडिगा आणि आरोपी चांगले मित्र होते. त्यांचे रोजचे उठणे-बसणे आणि एकत्र कामही करायचे. मात्र, हत्येमागील आरोपींनी दिलेले कारण ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. तिघांनी फक्त एका फॉरवर्ड मेसेजमुळे जीवलग मित्राची निर्घृण हत्या केली. विनयच्या मोबाईलवर एक ऑडिओ मेसेज आला, ज्यामध्ये जीवन नावाच्या व्यक्तीने त्याचा मित्र आणि आरोपी अक्षेंद्रला शिवीगाळ केली. विनयने तो मेसेज त्याला फॉरवर्ड केला.
पत्नी, मुलगी आणि आईसमोर हत्या
यामुळे दुखावलेल्या अक्षेंद्र आणि इतर दोन मित्रांनी मिळून मंगळवारी रात्री विनयची हत्या केली. आरोपी रात्री ११ वाजता विनयच्या घरी पोहोचले आणि विनयच्या खोलीत घुसून त्याच्यावर तलवारीचे अनेक वार केले. यावेळी विनयच्या पत्नी आणि आईने खूप विनवणी केली, मात्र आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. घटनेदरम्यान विनयच्या पत्नीने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत विनय गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
मिळालेल्या माहितीनुसार, विनय देवाडिग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर एक खूनाचा आरोप आहे. विनयला ज्या मित्रांनी मारले, तेही याच प्रकरणात सामील होते. सध्या पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत.