शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 9:01 AM

पाळीव कुत्र्याला ठार मारल्याने दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.

कानपूर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्याला ठार मारल्याने दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. 

वादाचं रुपांतर हाणामारीत

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या रसुलाबाद भागातील नौहा गावात एका गटाने दुसर्‍या गटावर कुत्र्याला ठार मारल्याचा आरोप केला. या दोन गटामध्ये जोरदार वाद झाला. पुढे हा वाद विकोपाला गेला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. रघुनंदन सिंह यांचा पाळीव कुत्रा हा गावातील शमसुद्दीन यांच्या घराजवळ मृतावस्थेत आढळला. त्यानंतर रघुनंदन यांनी शमसुद्दीन यांच्यावर कुत्र्याला ठार मारल्याचा आरोप केला. याच दरम्यान दोन गटात वाद झाला त्यामध्ये सात हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था

भाच्याने आपल्या वृद्ध काकाला जनावरांसोबत साखळीने बांधल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील घियाला गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 65 वर्षांच्या काकांना भाच्याने जनावरांसोबत गोठ्यात साखळीन बांधून ठेवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वृद्ध व्यक्तीच्या शरीरावर मारहाण केल्याच्या काही खुणाही पाहायला मिळाल्या आहेत. मानवाधिकार आयोगाने वृद्धाला मदत केली आहे. गावाचे सरपंच प्रवीण कुमार यांनी स्थानिकांच्या मदतीने या वृद्धाची सुटका केल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा