न्यायमूर्ती न्यायासनावरून उठले; आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीदरम्यान गोंधळ अन् गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:36 PM2021-10-26T15:36:31+5:302021-10-26T15:37:29+5:30

Aryan Khan Bail Hearing Updates : पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे.

The judge stand up from the bench; Confusion and crowd during Aryan Khan's bail hearing | न्यायमूर्ती न्यायासनावरून उठले; आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीदरम्यान गोंधळ अन् गर्दी

न्यायमूर्ती न्यायासनावरून उठले; आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीदरम्यान गोंधळ अन् गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देकोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर मुंबईउच्च न्यायालयात आज सुनावणी सुरु आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

आर्यनने मुंबई हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तो प्रभाकर साईलला ओळखत नाही किंवा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. अलीकडे जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आर्यन खानने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एनसीबीचे अधिकारी आणि राजकीय लोकांमधील वाद आहे. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर कोणताही आरोप केलेला नाही असं म्हटलं आहे. 

NCB वर केलेल्या आरोपांशी आमचा संबंध; कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही


पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा NCBने केला आहे. याच कारणामुळे हा जमीन नाकारला जाऊ शकतो. NCB ने आरोप केला आहे की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी पंच साक्षीदारांवर प्रभाव टाकला आहे आणि Aryan Khan चा जामीन अर्ज केवळ याच आधारावर फेटाळला जाऊ शकतो.

Read in English

Web Title: The judge stand up from the bench; Confusion and crowd during Aryan Khan's bail hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.