एका शब्दाने संपवलं आयुष्य! पतीच्या मस्करीचा मॉडेल पत्नीला बसला धक्का; टोकाचं पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:12 IST2026-01-30T10:02:28+5:302026-01-30T10:12:56+5:30

उत्तर प्रदेशात पतीने थट्टा केल्याने पत्नीने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Joke Turned Into Tragedy Model Ends Life After Husband Calls Her Bandariya in Lucknow | एका शब्दाने संपवलं आयुष्य! पतीच्या मस्करीचा मॉडेल पत्नीला बसला धक्का; टोकाचं पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा

एका शब्दाने संपवलं आयुष्य! पतीच्या मस्करीचा मॉडेल पत्नीला बसला धक्का; टोकाचं पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा

UP Crime: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका पतीने केलेल्या साध्या थट्टेचा शेवट अत्यंत भीषण आणि दुर्दैवी झाला. पतीने गमतीने माकडिण म्हटल्यामुळे नाराजा झालेल्या २८ वर्षीय मॉडेल पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. लखनऊच्या इंदिरा नगर सारख्या उच्चभ्रू परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, केवळ एका शब्दाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मृत तरुणीची ओळख तनु सिंह (२८) अशी झाली असून, ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती. तनुने चार वर्षांपूर्वी राहुल श्रीवास्तव याच्याशी प्रेमविवाह केला होता. बुधवारी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब सीतापूर येथील एका नातेवाईकाच्या घरून परतले होते. घरी सर्वजण मिळून गप्पा मारत होते आणि हसण्या-खिदळण्याचे वातावरण होते.

याच दरम्यान, राहुलने गंमत म्हणून तनुला माकडिण असे म्हटले. मॉडेलिंगची आवड असलेल्या आणि आपल्या रूपाबद्दल अत्यंत संवेदनशील असलेल्या तनुला हा शब्द जिव्हारी लागला. ती काहीही न बोलता रागावून आपल्या खोलीत गेली आणि तिने आतून दरवाजा लावून घेतला.

खिडकीतून पाहिले आणि पायाखालची जमीन सरकली

घरच्यांना वाटले की तनु थोड्या वेळाने शांत होईल. मात्र, तासाभरानंतर जेव्हा तिला जेवणासाठी आवाज दिला, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. राहुलने आणि तनुची बहीण अंजली यांनी दरवाजा ठोठावला, पण काहीच हालचाल झाली नाही. अखेर संशय आल्याने राहुलने खिडकीतून आत डोकावून पाहिले, तेव्हा त्याला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. तनुने गळफास घेतला होता. राहुल आणि शेजाऱ्यांनी तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मॉडेलिंगचे स्वप्न आणि टोकाची संवेदनशीलता

तनुची बहीण अंजलीने सांगितले की, तनुला मॉडेलिंगची प्रचंड आवड होती. ती तिच्या लूकबद्दल आणि करिअरबद्दल खूप जागरूक होती. राहुलने आणि अंजलीने मिळून तिची थट्टा केली होती, परंतु ती इतकी टोकाला जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. राहुल हा व्यवसायाने ऑटो चालक आहे, परंतु दोघांचे प्रेमविवाह झाल्यामुळे त्यांच्यात सर्वकाही आलबेल होते.

पोलीस तपास सुरू

इंदिरा नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनुचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. "कुटुंबात झालेल्या किरकोळ वादातून किंवा मस्करीत म्हटलेल्या शब्दावरून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते. अद्याप कोणाकडूनही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही," असे पोलिसांनी स्पष्ट केले.
 

Web Title : मज़ाक बना जानलेवा: पति की टिप्पणी के बाद मॉडल ने की आत्महत्या

Web Summary : लखनऊ में, एक मॉडल ने पति द्वारा मजाक में बंदर कहने पर आत्महत्या कर ली। 28 वर्षीय महिला टिप्पणी से परेशान थी। मॉडलिंग करियर के प्रति संवेदनशीलता उजागर हुई है।

Web Title : Joke Turns Deadly: Model Ends Life After Husband's Remark

Web Summary : In Lucknow, a model tragically committed suicide after her husband jokingly called her a monkey. Upset by the remark, the 28-year-old took her own life, shocking her family and highlighting the sensitivity surrounding her modeling career.