'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:57 IST2025-08-07T11:55:53+5:302025-08-07T11:57:15+5:30
Fraud Marriage Crime News: पोलिसांना का यावं लागलं, हॉस्पिटलमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
Fraud Wife Crime News: राजस्थानातील जोधपूरमध्ये बिहारमधील एका वधूने मोठा राडा केला. तिने पहिल्यांदा पैसे घेऊन एका तरुणाशी लग्न केले. सुहागरात झाल्यानंतर दोन दिवसांनी वराला तिचे गुपित कळताच वधूने त्याला खोलीत बंद केले. ती तिथून पळून जाऊ लागली. वधूने तिच्या साडीचा दोर बनवला आणि बाल्कनीला बांधला, नंतर साडीच्या मदतीने उडी मारली. त्यात तिचे दोन्ही पाय तुटले. त्यामुळे ती पोलिसांना सापडली. रुग्णालयात तिची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा पोलिसही चक्रावले. हे प्रकरण बनड पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे भरत नावाच्या तरुणाने लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याने २३ वर्षीय सुमन या तरुणीसह ६ जणांवर गंभीर आरोप केले आहेत. (Looteri Dulhan News)
दोन मुलींची स्थळं आली...
भरतने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे की, त्याच्या वडिलांना नंदकिशोर सोनी या व्यक्तीने २७ जूनला फोन केला. त्यानंतर त्याच्या ओळखीने संदीप शर्मा आणि रवी नावाच्या दोन ओळखीच्या लोकांनी दोन मुली आणल्या. एकीचे नाव सुमन आणि दुसरीचे नाव रुबी पांडे होते. त्यांनी सुमनला पसंत केले.
३ लाखांचे लग्न
त्यांना सांगण्यात आले की लग्नासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील. कारण या लग्नाचा खर्च खूप जास्त असेल. त्यांनी १ लाख ७० हजार रोख आणि १ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. भरत आणि सुमनचे आर्य समाज लग्न झाले. पण २ दिवसांनी भरतला सुमनचं खरं रूप समजलं की, ती लोकांना लग्न करून फसवून पळून जाते.
पतीला खरं कळताच वधू पळाली पण...
भरत तिला जाब विचारत असतानाच सुमनने त्याला खोलीत बंद केले आणि साडीच्या मदतीने बाल्कनीतून उडी मारली. पण नेमके तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे ती पळू शकली नाही. रवी आणि संदीप तिला मदत करण्यासाठी तिथे उभे होते. पण मी आरडाओरडा केल्याने घरचे जागे झाले. त्यानंतर रवी आणि संदीप वधूला सोडून पळून गेले आणि भरतच्या कुटुंबातील सदस्यांनी सुमनला पकडले.
दुखापत होऊनही अतिशहाणपणा सुरूच
सुमनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण इथेही तिचा अतिशहाणपणा सुरुच आहे. चौकशीत ती सतत आपल्या वडिलांचे नाव बदलत आहे. चौकशीत असे आढळून आले की ती आधीच विवाहित होती. लग्नाच्या वेळी तिने न्यायालय आणि आर्य समाजाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तिने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले आणि सर्व कागदपत्रे खोटी होती. त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आली. सध्या इतर सर्व आरोपींचा शोध सुरू आहे.