शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

बसमध्ये प्रवाशी महिलेच्या बॅगेतून एक लाख ६९ हजार किमतीच्या दागिन्यांची चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:10 PM

भुईंज येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या बसमधून किवळे येथील एका महिलेच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार घडला..

देहूरोड : बसने प्रवास करीत असताना भुईंज ( सातारा ) येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या किवळे येथील एका महिलेच्या बॅगेतील एक लाख ६९ हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार शनिवारी ( दि. ७) घडला आहे. देहूरोड पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात चोरीचा गुन्हा रविवारी ( दि १५ ) दाखल केला असून भुईंज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. याबाबत पूनम प्रभाकर जाधव ( वय २९ , रा. किवळे ता हवेली, जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुईंज ( सातारा ) येथे फिर्यादी पूनम जाधव या नाश्ता करण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांची बॅग बसमध्ये ठेवलेली होती. बॅगेत दोन तोळे वजनाचे ६० हजार किमतीचे ब्रेसलेट, ८२ हजार रुपये किमतीचे पावणे तीन तोळ्यांचे गंठण, १५ हजार किमतीची अंगठी, १२ हजार रुपये किमतीची अंगठी असे एकूण एक लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा भुईंज ( सातारा ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांच्याकडे वर्ग केला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीGoldसोनंPoliceपोलिस