धक्कादायक! शूजने घेतला विवाहितेचा जीव, गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:27 IST2021-09-01T15:26:22+5:302021-09-01T15:27:49+5:30
जवाहर नगर पोलिसांनी सांगितलं की, इथे एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहिलं तर महिलेचा मृतदेह रूममध्ये फासावर लटकलेला दिसला.

धक्कादायक! शूजने घेतला विवाहितेचा जीव, गळफास घेऊन केली आत्महत्या
दररोज आत्महत्यांच्या दुर्दैवी घटना समोर येत असतात. काही आत्महत्यांची कारणं वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरच्या जवाहर नगरमध्ये कौटुंबिक वादातून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सूचनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
जवाहर नगर पोलिसांनी सांगितलं की, इथे एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहिलं तर महिलेचा मृतदेह रूममध्ये फासावर लटकलेला दिसला.
तपासातून समोर आलं की, सीमा सोनीचं काल रात्री पती नरेश सोनीसोबत शूजवरून भांडण झाल होतं. वादानंतर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरात त्यांचा १६ वर्षीय मुलगा अक्षयही होता. महिलेने जेव्हा रूमचा दरवाजा उघडला नाही तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : महिला बनून सोशल मीडियावर मुलींकडून मागत होता अश्लील फोटो अन् व्हिडीओ; मेकॅनिक अटकेत)
घटनेबाबत शेजाऱ्यांनी सांगितलं की, महिलेचा पती तिला नेहमीच मारहाण करत होता. शेजाऱ्यांनी महिलेच्या पतीवर हत्येचा आरोप लावला आहे. सध्या जवाहर नगर पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.