महिला बनून सोशल मीडियावर मुलींकडून मागत होता अश्लील फोटो अन् व्हिडीओ; मेकॅनिक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:34 PM2021-09-01T13:34:43+5:302021-09-01T13:35:01+5:30

पोलिसांनुसार, फतेहपूर बेरी भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने तक्रार दिली की, तिने तिच्या वडिलांच्या फोनवर एक इन्स्टाग्राम आयडी तयार केलं.

23 years old AC mechanic from lucknow arrested for blackmailing minor girls on social media | महिला बनून सोशल मीडियावर मुलींकडून मागत होता अश्लील फोटो अन् व्हिडीओ; मेकॅनिक अटकेत

महिला बनून सोशल मीडियावर मुलींकडून मागत होता अश्लील फोटो अन् व्हिडीओ; मेकॅनिक अटकेत

Next

दिल्ली पोलिसांनी लखनौमधून एका मेकॅनिकला अटक केली आहे. मेकॅनिकवर आरोप आहे की, तो इन्स्टाग्राम आणि टेक्स्ट नाउ अॅपच्या माध्यमातून तरूणींसोबत आधी मुलगी बनून मैत्री करत होता आणि नंतर त्यांच्यांकडून अश्लील फोटो व व्हिडीओ घेऊन त्यांना ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनुसार, आरोपीच्या मोबाइलमध्ये साधारण १५० मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले आहे. 

एका मुलीच्या तक्रारीमुळे झाला भांडाफोड

टाइम्स नाउ हिंदीने दिलेल्या एका वृत्तानुसार, पोलिसांनुसार, फतेहपूर बेरी भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने तक्रार दिली की, तिने तिच्या वडिलांच्या फोनवर एक इन्स्टाग्राम आयडी तयार केलं. या इन्स्टाग्राम आयडीचा वापर करताना, ती एका दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आली. ती दुसऱ्या आयडीचा वापर करत होती. त्या दुसऱ्या मुलीने तक्रारदार मुलीसोबत मोठी बहीण या नात्याने सामान्य बोलणं सुरू केलं.

मुलगी बनून मुलींशी बोलत होता

एका महिन्यानंतर त्या कथित मुलीने तक्रारदार मुलीला काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवले. तक्रारदार मुलीलाही त्याने अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. त्याने तक्रारदार मुलीला विश्वास दिला की, तो तिचे फोटो कुणाला दाखवणार नाही. तक्रारदार मुलीनेही तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याला पाठवले. नंतर तिने आपला मोबाइल नंबरही त्याच्यासोबत शेअऱ केला. नंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलवर बोलणं सुरू केलं. पण त्याने कधी त्याचा चेहरा दाखवला नाही.

ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन

जेव्हा त्याने त्याचा चेहरा दाखवला नाही तर तक्रारदार मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं. मग त्या कथित मुलीने तक्रारदार मुलीला तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा तक्रारदार मुलीच्या मैत्रीणीने अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाहिले तर तिने त्या नंबरवर व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. फोन एका पुरूषाने उचलला. ज्यानंतर तक्रारदार मुलीच्या लक्षात आलं की, तिला फोन करणारी मुलगी नाही तर एक मुलगा आहे आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन केला जात आहे.

पोलिसांच्या हाती लागले पुरावे

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. त्यांनी त्या रहस्यमय कथित मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांच्या हाती बरीच वेगवेगळी माहिती लागली. इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना समजलं की, तरूणाने अनेक इन्स्टाग्राम आयडी तयार केले आहेत.

फोनमध्ये १५० मुलींचे अश्लील फोटो-व्हिडीओ

इन्स्टाग्रामकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना लखनौमधील एका तरूणाचा पत्ता मिळाला. त्यानंतर पोलिसांनी २३ वर्षीय अब्दुल समद नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे काही मोबाइल सापडले ज्यात १५० पेक्षा जास्त मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, तो अल्पवयीन मुलींसोबत बोलत होता आणि त्यांचे अश्लील व्हिडीओ व फोटो बघत होता. त्याने मुलींना फसवण्यासाठी स्वत;ला मुलगी म्हणून प्रेजेंट केलं. 

त्याने सांगितलं की, त्याने दहावीनंतर शिक्षण सोडलं आणि तो एअर कंडीशनर मेकॅनिक म्हणून काम करू लागला. त्याचे वडील टेलर आहेत आणि आई गृहीणी आहे. सोशल साइट्स आणि यूट्यूबमध्ये त्याला आधीपासून इंटरेस्ट होता. तो मुलगी बनून इतर मुलींशी बोलत होता. त्यांना ब्लॅकमेल करत होता. 
 

Web Title: 23 years old AC mechanic from lucknow arrested for blackmailing minor girls on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.