शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 16:58 IST

जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली.

ठळक मुद्देआरोपी वॉर्डबॉयविरोधात याआधीही अनेक तक्रारी आहेत. त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे समोर आले आहे. आरोपी वॉर्डबॉयविरोधात भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई - जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिकाऊ महिला डॉक्टरची वॉर्डबॉयने छेड काढली आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य सेवक अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशावेळी रुग्णालयातच महिला डॉक्टरचा विनयभंग होत असल्याची घटना चिंताजनक आहे.जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. ३० वर्षीय शिकाऊ महिला डॉक्टर नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी ४५ वर्षीय वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने या डॉक्टरला पकडून, तिची छेडछाड केली. याप्रकाराने भेदरलेल्या डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर, वरिष्ठांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आरोपीवर कायदेशीर केली.त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी वॉर्डबॉयविरोधात भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.काही दिवसांपूर्वीच क्वारंटाइन सेंटरमध्ये एका तरुणीची दोघांनी छेड काढल्याची घटना घडली होती. मालाड परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला होता. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तिला क्वारंटाईन सेंटरला बोलावले होते. त्यानंतर तेथे काम करत असलेल्या दोघांनी तिची छेड काढली होती. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. १५ जून रोजी ही घटना घडली होती.आरोपी वॉर्डबॉयविरोधात याआधीही अनेक तक्रारी आहेत. त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे समोर आले आहे. याआधीही लोकांना शिवीगाळ, मारहाण केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या आहेत. अनेकांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत. या आरोपीविरोधात अन्य कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणता गुन्हा दाखल आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

टॅग्स :MolestationविनयभंगArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय