"चित्रपटात चांगला रोल देतो, पण तुला हे सर्व करावंच लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:42 IST2023-03-14T16:41:27+5:302023-03-14T16:42:12+5:30

चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी अभिनेत्री या येडशी (जि. धाराशिव) येथे गेल्या होत्या

"It gives a good role in a movie, but you have to do it all.", FIR aganst director in solapur | "चित्रपटात चांगला रोल देतो, पण तुला हे सर्व करावंच लागेल"

"चित्रपटात चांगला रोल देतो, पण तुला हे सर्व करावंच लागेल"

सोलापूर - मी तुला चित्रपटात चांगला रोल देणार असून त्याकरिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत दिग्दर्शकाने अत्याचार केल्याची फिर्याद अभिनेत्रीने दिली आहे. याप्रकरणी दिग्दर्शक संजय पाटील (वय ५०, रा. बोल्हेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी, अहमदनगर) याच्यावर पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० सप्टेंबर २०२२ रोजी एका चित्रपटाच्या कार्यशाळेप्रसंगी एका महाविद्यालयात घडला. 

चित्रपटाच्या कार्यशाळेसाठी अभिनेत्री या येडशी (जि. धाराशिव) येथे गेल्या होत्या. एका महाविद्यालयामध्ये चित्रपटाचा स्टाफ हा मुक्कामासाठी थांबला होता. २० सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास दिग्दर्शक संजय पाटील याने अभिनेत्रीस मोबाईलवर फोन करून रूममध्ये बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर अभिनेत्रीस तू सगळ्यावर विश्वास ठेवते. माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. हा चित्रपट करण्याची गरज नाही. मी तुला चित्रपटात चांगले रोल देणार आहे, पैसे पण जास्त देईल, त्याकरिता तुला हे सर्व करावेच लागेल, असे म्हणत पाटील यांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचे अभिनेत्रीने फिर्यादीमध्ये म्हटल आहे. 

काम मिळणार नाही म्हणून गप्प राहिले

दिग्दर्शकाने कोणालाही सांगू नको असे बजावले होते. कामाची गरज असल्यामुळे तक्रार दिली असती तर मला काम मिळाले नसते. त्यामुळे घाबरून जाऊन या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितले नसल्याचेही पीडित अभिनेत्रीने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी पाटील याच्यावर पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे हे करीत आहेत.
 

Web Title: "It gives a good role in a movie, but you have to do it all.", FIR aganst director in solapur