नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:21 PM2021-09-14T15:21:09+5:302021-09-14T15:25:11+5:30

कुटुंबाने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रारही पाठवण्यात आली आहे.

Intoxicated milk fed her husband; The bride passed by with 50 thousand and 2 tolas of gold | नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली

नशेचं औषध घातलेलं दूध पतीला पाजलं; ५० हजार अन् २ तोळं सोनं घेऊन नवरी पसार झाली

Next
ठळक मुद्देघटना रामपूरच्या ठाणा गंज परिसरातील आहे. येथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, ५ ऑगस्ट रोजी रामपूर येथील एका महिलेशी त्याने सर्व रीतीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी त्याची वधू फरार झाली.

रामपूर - उत्तर प्रदेशातील रामपूर शहरात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक वधू लग्नानंतर दोन महिन्यांतच पतीला चकवून पळून गेली. असा आरोप आहे की, वधूने तिच्या पतीला दुधात नशेचे औषध मिक्स करून प्यायला दिले आणि त्यानंतर ती २ तोळे सोनं आणि काही रोख घेऊन घरातून पळून गेली. कुटुंबाने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रारही पाठवण्यात आली आहे.

घटना रामपूरच्या ठाणा गंज परिसरातील आहे. येथे एका व्यक्तीने आरोप केला आहे की, ५ ऑगस्ट रोजी रामपूर येथील एका महिलेशी त्याने सर्व रीतीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी त्याची वधू फरार झाली. ती तिच्यासोबत २ तोळे सोने आणि ५ हजार रोख रक्कमघेऊन पळून गेली आहे. आता पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे आणि सीएम पोर्टलवर याबाबत तक्रार केली आहे.

एका महिन्यापूर्वी लग्न झाले
गंजचा रहिवासी असलेला इरफान व्यवसायाने कारागीर आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्याचे लग्न इकरा या रामपूर येथील मुलीशी झाले होते. इरफान म्हणतात की, सर्व काही ठीक चालले होते, परंतु अचानक रात्री पत्नीने त्याच्या दुधात नशेचे औषध मिसळले आणि घरातील सामान घेऊन पळून गेली. त्याने पुढे सांगितले की, त्याने तिला एक दिवसापूर्वी माहेराहून आणले होते.

आई -वडिलांनाही माहित नाही, मुलगी कुठे आहे?
त्याचबरोबर मुलीच्या माहेरच्या लोकांनी तिचा पत्ता सांगण्यास नकार दिला आहे. माहेरच्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मुलगी कुठे गेली याची त्यांना माहिती नाही. तिचा फोनही बंद येत आहे. पीडित तरुणाने नोंदणीकृत पोस्टद्वारे रामपूरच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार पत्र पाठवले आहे. यासोबतच मुख्यमंत्री पोर्टलवरही तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Intoxicated milk fed her husband; The bride passed by with 50 thousand and 2 tolas of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.