शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

निर्दयीपणा ! सतत रडते म्हणून आईने १६ दिवसांच्या चिमुकलीची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 7:34 PM

या प्रकरणी समा नदीम अन्सारी (२५) या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे रागातून हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी समाला फिरवून प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर एका क्षणाला समाचा बांध फुटला. राग अनावर झालेल्या समाने कंटाळून मुलीला घरामागील नाल्यात फेकून तिची हत्या केली.  

 

मुंबई - सतत रडणाऱ्या मुलीच्या आवाजाने कंटाळून एका आईने चक्क आपल्या १६ दिवसांच्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी समा नदीम अन्सारी (२५) या महिलेस पोलिसांनीअटक केली आहे. रागातून हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. 

सायनच्या मदिना मस्जिदजवळ समा आणि नदीम हे दाम्पत्य राहत. नदीम हा फर्निचर बनवण्याचे काम करतो. दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. नुकताच समाने एका मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे घरचे वातावरण आनंदी होते. गेल्या गुरुवारी १६ दिवसांची मुलगी वारंवार रडत असल्याने समाचा पारा चांगलाच चढला होता. त्यावेळी राग अनावर झालेल्या समाने कंटाळून मुलीला घरामागील नाल्यात फेकून तिची हत्या केली.  काही वेळाने आपण केलेली चूक तिच्या लक्षात आल्यानंतर समाने मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. सर्वत्र शोधाशोध सुरु असताना मुलगी घरामागील नाल्यात सापडली. स्थानिकांनी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्या १६ दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नदीमने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केला. त्यानंतर पोलीस तपासात मुलीला झोपवून शौचालयासाठी आपण खाली आल्याची माहिती समाने पोलिसांना दिली. समा देत असलेल्या माहितीत संशय पोलिसांना आला. पोलिसांनी समाला फिरवून प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानंतर एका क्षणाला समाचा बांध फुटला. त्यावेळी रडत रडत तिने मुलीच्या हत्येची कबूली दिली. रागातूनच हे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसKidnappingअपहरणMurderखून