तळोजा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 14:49 IST2020-05-27T14:47:17+5:302020-05-27T14:49:37+5:30

तळोजा कारागृहात खोली क्रमांक ८ मध्ये कैद्यांना देण्यात येणाऱ्या चादरीच्या साहाय्याने ही आत्महत्या केली

Inmate committed suicide in Taloja jail pda | तळोजा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या

तळोजा कारागृहात कैद्याने केली आत्महत्या

ठळक मुद्देबाळू बाबाराव खडसिंगे (40) असे या आरोपीचे नाव आहे.खडसिंगे याच्यावर भा. दं. वि. कलम 302, 353 सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

पनवेल - तळोजा कारागृहात बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास एका कैद्याने गळफास फास घेऊन आत्महत्या केली. बाळू बाबाराव खडसिंगे (40) असे या आरोपीचे नाव आहे. चादरीच्या साहाय्याने या कैद्याने ही आत्महत्या केली. 
      

तळोजा कारागृहात खोली क्रमांक ८ मध्ये कैद्यांना देण्यात येणाऱ्या चादरीच्या साहाय्याने ही आत्महत्या केली असल्याचे कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी स्पष्ट केले. 2019 साली खंडसिगे याला कल्याण कारागृहात गैरवर्तणूक करीत असल्याच्या कारणाने तळोजा कारागृहात आणण्यात आले होते. खडसिंगे याच्यावर भा. दं. वि. कलम 302, 353 सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार

 

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

 

आमच्या दुष्मनाच्या घरी जायचे नाही म्हणत केली एकाला मारहाण

 

खळबळजनक! गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

Web Title: Inmate committed suicide in Taloja jail pda