mother and two daughters dead bodies found out of village in unnao pda | धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी सरोजिनी आणि तिची 8 व 4 वर्षाच्या मुलींचा मृतदेह गावातील तलावाजवळ आढळला.8 वर्षाच्या मुलीचे नाव शिवानी आहे, तर 4 वर्षाच्या मुलीचे नाव रोशनी आहे. मायलेकी मृत अवस्थेत एकमेकांच्या मिठीत आढळून आल्या होता.

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे आई आणि दोन मुलींच्या हत्येने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण औरस पोलिस स्टेशन परिसरातील पूरन खेडा गावचे आहे. गावातील बाहेरील तलावाजवळ सर्व मृतदेह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृतदेहांच्या गळ्यात कपड्याचा फास होता. फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी पोलिसांसह दाखल झाली.

मृताचे नाव सरोजिनी आहे. मंगळवारी सकाळी सरोजिनी आणि तिची 8 व 4 वर्षाच्या मुलींचा मृतदेह गावातील तलावाजवळ आढळला. 8 वर्षाच्या मुलीचे नाव शिवानी आहे, तर 4 वर्षाच्या मुलीचे नाव रोशनी आहे. मायलेकी मृत अवस्थेत एकमेकांच्या मिठीत आढळून आल्या होता.

घटनेची माहिती मिळताच उन्नावचे एसपी विक्रांत वीर तीन पोलीस ठाण्यांच्या दलासह घटनास्थळी पोहोचले. तसेच, फॉरेन्सिक तज्ज्ञ पथकही घटनास्थळी बोलावले गेले. पोलिसांनी पती व मेहुण्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तसेच ग्रामस्थांचा जबाब नोंदविले जात आहेत.

 

.

Coronavirus : ओशिवरा पोलीस ठाणे बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

 

बापरे! विहिरीत पडलेल्या 'त्या' ९ जणांची हत्या फक्त प्रेयसीचा खून लपवण्यासाठीच

 

ईदच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, ५ संशयितांना अटक

Web Title: mother and two daughters dead bodies found out of village in unnao pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.