शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड गजा मारणेला पुन्हा बेड्या ठोकल्या; सातारमध्ये पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 22:56 IST

गजानन मारणे हा जावळी तालुक्यातील मेढा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर ती सातारा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार मेढा पोलिसांनी बाजारपेठ रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली होती.

 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कुख्यात गँगस्टर गजानन मारणे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील मेढा येथे ताब्यात घेतले असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात येणार आहे. मारणेबरोबर त्याच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, गजानन मारणे याच्याविरोधात ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे २२ फेब्रुवारी रोजी पाठविला होता. देशमुख यांनी हा प्रस्ताव २ मार्च रोजी मंजूर केला होता. तेव्हापासून ग्रामीण पोलीस दलाची तीन पथके मारणे याचा शोध घेत होती. तो कोल्हापूर, सातारा भागात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचेनिरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक दोडगे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके त्याचा शोध घेत होती. दोन दिवसांपूर्वी तो कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तिकडे गेली होती. पण तो पोलिसांना गुंगारा देऊन सातार्यात पळून आला होता. त्यानंतर सातारा पोलिसांच्या मदतीने जावळी तालुक्यातील मेढा येथे शनिवारी सायंकाळी गजानन मारणे याला पकडण्यात आले.त्याच्याबरोबर आणखी ३ साथीदार होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गजानन मारणे याला अटक केल्यानंतर एमपीडीए कायद्यान्वये त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मारणे याच्या समर्थकांनी जंगी मिरवणुक काढली होती. पोलिसांना खुले आव्हान दिल्याने पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांनी मारणेसह त्याच्या साथीदारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी कोथरुड व तळेगाव दाभाडे येथील दोन गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला होता. मात्र, हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळला होता.गजानन मारणे हा जावळी तालुक्यातील मेढा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर ती सातारा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार मेढा पोलिसांनी बाजारपेठ रस्त्यावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांचे सहकार्यांनी एका कारमध्ये गजानन मारणे व त्याच्या साथीदार बसले असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने कारमधील सर्वांना ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण पोलीस मेढा पोलीस ठाण्यात पोहचले असून ते गजानन मारणे व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन पुण्याला आणतील वत्यानंतर मारणे याची येरवडा कारागृहात  रवानगी  होईल.

टॅग्स :Policeपोलिस