नाशिक शहरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना; परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 08:16 IST2023-01-22T08:16:03+5:302023-01-22T08:16:23+5:30

खून झालेल्या युवकाची ओळख पटली नसल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले.

Incident of stone crushing of youth in Nashik city; There is only excitement in the area | नाशिक शहरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना; परिसरात एकच खळबळ

नाशिक शहरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना; परिसरात एकच खळबळ

-संदीप झिरवाळ

नाशिक- शहरातील पंचवटी येथील पेठरोड वरील हमालवाडी (तुळजाभवानी नगर) येथे शनिवारी (दि.21) सकाळी एका 25 ते 30 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून खून झालेल्या युवकाची ओळख पटली नसल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले असून पालकमंत्री दादा भुसे यांनी कालच गुन्हेगारी मोडून काढली जाईल असे सांगितले होते. मात्र 24 तासातच ही घटना घडली आहे.

Web Title: Incident of stone crushing of youth in Nashik city; There is only excitement in the area