मसाज पार्लरच्या नावावर सुरु होतं सेक्स रॅकेट, मुलींना ड्रग्ज देऊन पाठवायचे ग्राहकांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:07 IST2022-02-04T16:05:23+5:302022-02-04T16:07:07+5:30
Sex Racket : यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली.

मसाज पार्लरच्या नावावर सुरु होतं सेक्स रॅकेट, मुलींना ड्रग्ज देऊन पाठवायचे ग्राहकांकडे
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुलींना ओलीस ठेवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलींना ड्रग्ज देऊन ग्राहकांकडे पाठवले जात होते. यातील एक तरुणी कशीतरी या टोळीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली. तिने आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून इतर मुलींची सुटका केली आणि आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोमती नगरमध्ये एक तरुणी मसाज पार्लरमध्ये काम करायची. येथे काम करणाऱ्या काही लोकांनी तिला ६ महिन्यांपूर्वी फोन करून येथे नोकरीसाठी बोलावले. येथे पोहोचल्यावर तिला एका घरात ओलीस ठेवण्यात आले. या पार्लरमध्ये देशभरातून मुलींना बोलावून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी ८ मुलींची सुटका केली
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवर गांभीर्याने कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकून 6 तरुणांना अटक केली आणि 8 मुलींची सुटका केली. आरोपींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या टोळीतील इतर सदस्यांचाही शोध सुरू आहे.
लज्जास्पद! मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप, आरोपींनी पीडितेला लुधियानाहून जबरदस्तीने आणले
बाबो! 2 वर्षांत 6 लग्नं, नववधू प्रियकरासह पळून गेली सर्वांसमोर बाईकवर बसून, कुटुंबीय राहिले पाहत
पोलिसांनी ६ आरोपींना अटक
याप्रकरणी पूर्व विभागाचे डीसीपी कासिम अब्दी सांगतात की, एका तरुणीने तक्रार केली होती की, तिच्यावर अनैतिक पद्धतीने दबाव टाकून सेक्स रॅकेट चालवले जात आहे. छापे टाकून अनेकांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. आता त्यांची चौकशी सुरू आहे.