शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेचा प्रियकराकडून खून; थेरगावमध्ये मृतदेह रिक्षात ठेवून पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 08:16 IST

काही दिवसांपासून विनायक मात्र शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या संशयावरूनच त्याने रात्री गळा आवळून तिचा खून केला

पिंपरी (पुणे) प्रवासी वाहतूक करताना झालेल्या ओळखीतून रिक्षाचालकाने 'ती'च्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून पळ काढला. थेरगाव येथील जगतापनगर येथे बुधवारी (दि.११) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

शिवानी सोमनाथ सुपेकर ऊर्फ संतोषी लकमीचंद भुंबक (२७, रा. वडगाव मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेची बहीण शारदा नवीन जोशी (३५, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विनायक अनिल आवळे (३५, रा. एमएम चौकाजवळ, काळेवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ३५ वर्षीय विनायक विवाहित आहे. मात्र, पत्नी सोबत राहत नसल्याने तो एकटाच राहत असून रिक्षा चालवतो. फिर्यादी शारदा यांची बहीण शिवानी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तो शिवानी यांच्या आई-वडिलांकडे राहतो, प्रवासी वाहतूक करताना विनायक आवळे याची शिवानीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहत होते. काही दिवसांपासून विनायक मात्र शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या संशयावरूनच त्याने रात्री गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या घरासमोर रिक्षात मृतदेह ठेवून तो फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी