शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

४० लाख खर्च करून इन्कम टॅक्स अधिकाऱ्याशी मुलीचं लग्न लावलं; २१ महिन्यांनी 'सत्य' बाहेर, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:58 IST

ग्वाल्हेरमधील २७ वर्षीय इंजिनिअर मुलीचं लग्न २१ महिन्यांपूर्वी मुरैना येथे राहणाऱ्या महावीर अवस्थीसोबत केले होते. हा युवक सरकारी नोकरीत होता

ग्वाल्हेर - महावीर अवस्थी, इन्कम टॅक्स अधिकारी...याच नावावर ४० लाख हुंडा घेऊन एका पित्याने त्याच्या इंजिनिअर मुलीचं लग्न लावले. लग्नाच्या २१ महिन्यांनी जे सत्य समोर आले त्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या मुलासोबत मुलीचे लग्न लावले तो सरकारी नोकरीत नाही. तो एक विश्वासघातकी आहे जो फसवणूक करून मुलींना जाळ्यात ओढतो. त्यानंतर पीडित पत्नी आणि तिच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.

ग्वाल्हेरमधील २७ वर्षीय इंजिनिअर मुलीचं लग्न २१ महिन्यांपूर्वी मुरैना येथे राहणाऱ्या महावीर अवस्थीसोबत केले होते. हा युवक सरकारी नोकरीत होता. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला लगेच होकार दिला. लग्नावेळी मुलाची पोस्टिंग कोलकाता येथे आहे असं त्याने दावा केला. महावीर मुरैना जिल्ह्यातील कॅमरी गावात राहणारा होता. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुलाच्या शिक्षणासोबत तो आयकर विभागात अधिकारी असल्याचे छापण्यात आले. लग्नावेळी मुलीच्या वडिलांनी जवळपास ४० लाख हुंडा म्हणून दिला होता. 

लग्नानंतर काही दिवसांनी महावीर पत्नीला सोडून कथितपणे ड्युटीला निघून गेला. त्यानंतर सासरच्या लोकांनी सूनेचा छळ सुरू केल्याचा आरोप आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरच्यांनी सूनेच्या घरच्यांकडून ७० लाख आणि एका कारची मागणी केली. मुलीच्या कुटुंबाने विरोध करताच मुलाने मी आयकर खात्यात अधिकारी आहे इतका तर माझा हक्क आहे असं म्हटले. परंतु जेव्हा मुलीला पतीचा खरा चेहरा कळला तेव्हा तिला धक्का बसला. नातेवाईकांच्या मदतीने मुलीने पतीच्या ऑफिसमध्ये चौकशी केली परंतु महावीर अवस्थी नावाचा कुणीही अधिकारी आयकर खात्यात नसल्याचे तिला कळले. जेव्हा पत्नीने पतीला जाब विचारला तेव्हा तुला जे करायचे असेल ते कर अशी धमकी दिली. त्यानंतर सासरच्यांनी मुलीचा छळ करून तिला घराबाहेर काढले. 

दरम्यान, जेव्हा पोलीस आरोपीच्या गावात पोहचली तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी जबाब दिला. राधेश्याम अवस्थी यांचा मोठा मुलगा महावीर अवस्थी आयकर खात्यात अधिकारी आहे. दिल्लीत त्याचा बंगला आहे तर छोटा मुलगा ग्वाल्हेरमध्ये डॉक्टर आहे. परंतु गावातील तणावामुळे गावकऱ्यांनी लिखित जबाब नोंदवण्यास नकार दिला. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक आणि हुंडा मागितल्याच्या आरोपात पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या फसवणुकीच्या आरोपात महावीर अवस्थी दिल्लीतील जेलमध्ये बंद आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : ₹40 Lakh Dowry for Income Tax Officer: Fraud Exposed!

Web Summary : A father spent ₹40 lakh on his daughter's wedding to a supposed Income Tax officer. After 21 months, the groom was revealed to be a fraud. He was arrested for cheating and demanding dowry. The family filed a police complaint, and he is now jailed in Delhi.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी