शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

By अझहर शेख | Updated: March 26, 2025 19:09 IST

प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले.

अझहर शेख

नाशिक : पाथर्डी गावाच्या शिवारातील दाढेगाव रस्त्यावर २०१९ साली शिवजयंतीच्या दिवशी चौघा जणांनी तीन अल्पवयीन गुन्हेगारांच्या मदतीने एका युवकावर शस्त्रांनी प्राणघातक हल्लाच चढवून गंभीर जखमी करत ठार मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी चौघा आरोपींना आजन्म कारावास व ४० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाढेगाव रस्त्यावर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास रितेश अनिल पाईकराव (१९, रा.सुकदेवनगर, पाथर्डी) याच्यावर आरोपी उमेश कोंडीबा आव्हाड (१८), नरेश नाना दोंदे (१८), नयन सुरेश शिंदे (१९), अविनाश प्रल्हाद सावंत (१८) या चौघांनी त्यांच्या इतर तीन विधीसंघर्षित बालकांना सोबत घेऊन चाकू, चॉपर, गुप्ती व तलवारीने हल्ला केला होता. पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक आर.सी.शिंदे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत, आरोपींविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ.सुधीर कोतवाल यांनी कामकाज केले. यावेळी कोतवाल यांनी आठ साक्षीदार तपासले. मयत रितेशचे वडील आणि जावई सुरेश गायकवाड यांचा प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले.

रक्तबंबाळ अवस्थेत पित्याने मुलाला उचललेरितेशचे वडील गुन्ह्यातील फिर्यादी अनिल पाईकराव (४४) यांच्या लक्षात आली असता, त्यांनी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्नही केला होता. यावेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असता, गंभीररीत्या जखमी रितेश यास रक्तबंबाळ अवस्थेत उचलून रिक्षामधून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. ही बाब रितेशचे वडील गुन्ह्यातील फिर्यादी अनिल पाईकराव (४४) यांच्या लक्षात आली असता, त्यांनी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्नही केला होता. यावेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असता, गंभीररीत्या जखमी रितेशला पाईकराव यांनी उचलून रिक्षामधून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले होते.