डेटींग ॲपने झाली मैत्री, मित्रानेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:21 IST2022-06-10T18:22:51+5:302022-06-20T16:21:05+5:30
Rape Case : येथे महिलेने एका व्यक्तीवर हॉटेलमध्ये बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने आरोपीला डेटिंग ॲपद्वारे भेटले असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

डेटींग ॲपने झाली मैत्री, मित्रानेच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केला बलात्कार
दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. हे प्रकरण दिल्लीतील द्वारका येथील असल्याचे सांगितले जात आहे. येथे महिलेने एका व्यक्तीवर हॉटेलमध्ये बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने आरोपीला डेटिंग ॲपद्वारे भेटले असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ३ जूनचे आहे. येथील द्वारका येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. डेटिंग ॲपद्वारे आरोपी आणि पीडितेच्या संपर्कात आले. आरोपी हा हैदराबादचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. आरोपींच्या शोधात पोलिस छापे टाकत आहेत.
आरोपी हैदराबादचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. यानंतर मुलाने मुलीला 5 स्टार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. या महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
A woman was allegedly raped in a five-star hotel in Delhi's Dwarka area on 3rd June. The accused & victim came in contact through a dating app. The accused is a resident of Hyderabad & is currently absconding. Police are conducting raids in search of the accused: Delhi Police
— ANI (@ANI) June 10, 2022