रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये इन्चार्जनं केला बलात्कार; पीडित तरूणीचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 16:51 IST2022-03-20T16:30:48+5:302022-03-20T16:51:03+5:30
Rape Case : जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रभारी संजयने तिला जबरदस्तीने वॉशरूममध्ये पकडले आणि बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये इन्चार्जनं केला बलात्कार; पीडित तरूणीचा खळबळजनक आरोप
दक्षिण पश्चिम दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या सफदरजंग एन्क्लेव्हमधील एका रेस्टॉरंटमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील एक मुलगी सेवा कर्मचा-यांव्यतिरिक्त रेस्टॉरंटमध्ये काम करते. जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा प्रभारी संजयने तिला जबरदस्तीने वॉशरूममध्ये पकडले आणि बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.
मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांची आधीच ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, ती हुमायूनपूरमधील लामाच्या किचनमध्ये सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करते. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ती रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये पोहोचली, त्यानंतर रेस्टॉरंटचे इन्चार्ज संजयही तेथे पोहोचले आणि माझ्यासोबत गैरवर्तन केले. पीडितेने सांगितले की, घटनेच्या दिवशी मी कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी हुमायूनपूर येथील रहिवासी आरोपी संजय याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी गेल्या एक वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्याचीही माहिती मिळाली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.