शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजित प्रेम प्रकरण! २ दिवसांपूर्वी खाकी अंगावर चढवली अन् तिसऱ्या दिवशी बापाच्या खूनात अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 00:02 IST

या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे.

परिमल डोहणे ​

चंद्रपूर - प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा तपास आता तांत्रिक वळणावर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार या दोघांचेही व्हॉईस सॅम्पल्स पोलिसांकडून घेण्यात आले असून ते नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

​तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आधीच जप्त केले आहेत. तीन वर्षांपूर्वी रचलेला हा कट आणि त्यादरम्यान झालेली संभाषणे यांचे धागेदोरे मिळवण्यासाठी हे व्हॉईस सॅम्पलिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आरोपींनी एकमेकांशी केलेल्या संवादाची पुष्टी करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल या खटल्यात मुख्य पुरावा ठरू शकतो.

​शवविच्छेदन अहवाल आणि 'व्हिसेरा'वर मदार​मृत जयंत बाल्लावार यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता रासायनिक विश्लेषणाद्वारे विषबाधेची पुष्टी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

​तिन्ही आरोपींना एक दिवसाचा पीसीआर

​या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे. तिघांनाही पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती एसडीपीओ प्रमोद चोगुले यांनी दिली.

​दोघांचेही खाकी सेवेचे स्वप्न अर्धवट​कॉन्स्टेबल आशिष शेडमाके नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याची दोन-तीन वादग्रस्त प्रकरणे पुढे आली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. मात्र आता तो पुन्हा लवकरच रुजू होणार होता. त्यातच हे प्रकरण पुढे आले. तर कॉन्स्टेबल आर्या जयंत बाल्लावार हिने २३ मार्च २०२६ रोजी पासिंग आऊट परेड पूर्ण केली होती. मात्र दोन दिवसांनंतर हत्येचे प्रकरण पुढे आल्याने तिच्या खाकी वर्दीचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे

English
हिंदी सारांश
Web Title : Love, Murder, and Khaki: Cop Accused in Father's Poisoning

Web Summary : A constable and her lover are accused of poisoning her father. Voice samples are crucial evidence. Both officers' careers are now jeopardized after arrest and investigation into the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी