लाथाबुक्क्यांनी, पाईपनं मारहाण करून जावयाची हत्या?; नातवानं आजीला सांगितला प्रकार, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:28 IST2025-03-27T17:28:16+5:302025-03-27T17:28:55+5:30
सुनीलने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले परंतु त्याने फाशी घेतल्याचे काही आढळून आले नाही. त्यामुळे सुनीलचा मृत्यू त्याच्या घरच्यांना संशयास्पद वाटला.

लाथाबुक्क्यांनी, पाईपनं मारहाण करून जावयाची हत्या?; नातवानं आजीला सांगितला प्रकार, मग...
अहिल्यानगर - श्रीरामपूर येथे न राहता अहिल्यानगरला मुलाबाळासह जाण्याचा आग्रह करणाऱ्या जावयाला मारहाण करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी कमल शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलगा सुनिल शिंदे आणि सून ताराबाई यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असल्याने दोन्ही नातेवाईकांना घेऊन सून माहेरी श्रीरामपूरला आई वडिलांकडे गेली होती. मुलगा सुनील पत्नी ताराबाईसह श्रीरामपूरला राहायला आला मात्र नगरला पुन्हा यायचा त्याचा आग्रह होता असं आईने सांगितले.
अहिल्यानगरला येण्यावरून पती-पत्नीत वाद होता. श्रीरामपूर शहरात साई मंदिराजवळ एका बांधकामाच्या ठिकाणी मुलगा आणि सून झोपडीत राहून वॉचमन म्हणून काम करत होता. एकेदिवशी सुनीलने विषारी औषध पिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने श्रीरामपूरला आलो तेव्हा त्याचा मृतदेह साखर कामगार हॉस्पिटलच्या शवागृहात होता. त्यावेळी सुनीलने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले परंतु त्याने फाशी घेतल्याचे काही आढळून आले नाही. त्यामुळे सुनीलचा मृत्यू त्याच्या घरच्यांना संशयास्पद वाटला.
नातवानं सांगितलं सत्य
त्यानंतर सुनीलच्या आईने नातवाला विश्वासात घेत माहिती असता सुनीलला पत्नी आणि सासू यांनी पाईप, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. मारहाणीनंतर सुनील घराच्या बाजूस गेला असता सून आणि आई त्याच्या मागे गेले. यावरून मुलाला गळा दाबून ठार मारले अशी तक्रार आई कमल शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. आईच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून पोलीस तपास करत आहेत.