आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:58 IST2022-01-26T16:56:00+5:302022-01-26T16:58:04+5:30
Robbery Case : पोलिसांनी पाहणी करुन पंचनामा केला.

आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले
जामनेर जि. जळगाव : मुख्य बाजारपेठेतील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने फोडले आणि त्यातील रोकड लांबविली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी पाहणी करुन पंचनामा केला. नेमकी किती रक्कम लांबवली याची पोलिसांकडूध शहानिशा केली जात आहे. याच एटीएम जवळ आयडीबीआयसह दोन बँका आहेत. व्यापारी पेठेतील या चोरीच्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. पोलिसांकडुन गुन्हा दाखल केला जात आहे.
२ रुपयांच्या वादातून ॲसिड फेकले, तरुण-तरुणी जखमी, पोलीस म्हणतात...