२ रुपयांच्या वादातून ॲसिड फेकले, तरुण-तरुणी जखमी, पोलीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 10:00 PM2022-01-21T22:00:01+5:302022-01-21T22:00:41+5:30

आग्रा ( उत्तर प्रदेश ) : जिल्ह्यातील शहागंज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सराय ख्वाजामध्ये दोन रुपयांवरून असा वाद झाला ...

Acid thrown out of Rs 2 dispute, youths injured, police say ... | २ रुपयांच्या वादातून ॲसिड फेकले, तरुण-तरुणी जखमी, पोलीस म्हणतात...

२ रुपयांच्या वादातून ॲसिड फेकले, तरुण-तरुणी जखमी, पोलीस म्हणतात...

googlenewsNext

आग्रा (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यातील शहागंज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सराय ख्वाजामध्ये दोन रुपयांवरून असा वाद झाला की, एका बाजूने अ‍ॅसिड फेकले, अपघातात एक तरुण आणि मुलगी जखमी झाले. पोलीस या घटनेला चुकून घडलेला अपघात म्हणत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहगंज पोलिस स्टेशनच्या सराय ख्वाजा चौकी भागातील खासपुरा ठाकूर गल्लीत सलमान नावाचा एक मुलगा शेजारच्या दुकानदार सफरदीनकडून पाच रुपये किमतीची टूथपेस्ट घेण्यासाठी गेला होता. त्यावर दुकानदाराने अगोदर उधारीवर घेतलेल्या शॅम्पूचे दोन रुपये देण्यास सांगितले व वस्तू देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर सलमानने घरातून दहा रुपये आणले आणि उधारीचे दोन रुपये भरल्यानंतर आठ रुपये परत घेतले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलगा पुन्हा दुकानदाराकडून सामान घेण्यासाठी गेला असता दुकानदाराने त्याला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावर सफरदीनच्या मुलांनी टॉयलेट साफ करण्यासाठी वापरण्यात आलेली ॲसिडची बाटली फेकली जी भिंतीवर आदळल्यानंतर स्फोट झाला. या अपघातात सफरदीनचा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला उभी असलेली मुलगी रुबिना जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

क्लबहाऊस चॅटवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

मात्र, या संदर्भात शहागंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक जसवीर सिंग सांगतात की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुकानदाराकडे ॲसिड विक्रीचा परवाना नसेल, तर कारवाई होऊ शकते.

Web Title: Acid thrown out of Rs 2 dispute, youths injured, police say ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.