DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:52 IST2025-10-27T12:48:40+5:302025-10-27T12:52:44+5:30
खरगोनच्या कलेक्टर भव्या मित्तल यांच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांना WhatsApp मेसेज येत असून त्यात पैसे मागितले जात आहेत.

DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
मध्य प्रदेशमधील सायबर गुन्हेगारांनी आता थेट जिल्हा प्रशासनाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. खरगोनच्या कलेक्टर भव्या मित्तल यांच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांना WhatsApp मेसेज येत असून त्यात पैसे मागितले जात आहेत.
कलेक्टर भव्या मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं की त्यांना त्यांच्या नावाने आणि WhatsApp वर मेसेज आला आहे. डिस्प्ले पिक्चर (डीपी) देखील त्यांचाच आहे. चौकशी केल्यानंतर तो नंबर व्हिएतनाममधील असल्याचं समोर आलं.
मेसेजमध्ये एका बँक खात्याची माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, "मी एका मीटिंगमध्ये आहे आणि मला तातडीने पैसे भरायचे आहेत. कृपया या खात्यात पैसे जमा करा."
कलेक्टर भव्य मित्तल यांनी तात्काळ या सायबर फसवणुकीची तक्रार खरगोनचे पोलीस अधीक्षक रवींद्र वर्मा यांना केली. सायबर सेलचे प्रभारी दीपक तलवारे यांनी सांगितल की, राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि चौकशी सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना अशा सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केलं आहे. सर्व संबंधितांना बनावट नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही कॉल किंवा मेसेजला उत्तर देऊ नका आणि त्यांना त्वरित ब्लॉक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.