'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाचं आमिष दाखवून MBAच्या विद्यार्थ्याला लुटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:42 IST2022-06-02T15:04:07+5:302022-06-02T15:42:55+5:30
The MBA student was robbed : याप्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाचं आमिष दाखवून MBAच्या विद्यार्थ्याला लुटलं
पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरूणासोबत फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. शरीर सुखाचं आमिष दाखवून बोलावून घेतलं आणि त्याच्याकडून ५५ हजार रूपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पुण्यात एमबीए करणाऱ्या एका विद्यार्थ्याला शरीरसुखासाठी बोलावले आणि एका खोलीत रात्रभर डांबून ठेवले होते. त्याला शरीरसुखाचं आमिष दाखवून बोलावून घेतलं. नंतर रात्री त्याचा व्हिडीओ काढला आणि गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी ४ जणांना पोलिसांनीअटक केली आहे. साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून २३ वर्षीय तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.