Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:21 IST2025-09-29T12:21:10+5:302025-09-29T12:21:37+5:30
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला अटक झाल्यानंतर नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये १७ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यनंद सरस्वती याला अटक झाल्यानंतर नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. तो आता पोलिसांसमोर गेल्यावर खूपच घाबरला आहे. चौकशीदरम्यान "मी माझ्या फोनचा पासवर्ड विसरलो आहे, मला भीती वाटत आहे" असंच वारंवार म्हणत आहे. याच फोनचा वापर करून तो विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच वसतिगृह आणि कॅम्पसमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्यनंद अटक झाल्यापासून अत्यंत अस्वस्थ दिसत होता. चौकशीदरम्यान तो वारंवार हात जोडून विनंती करत होता की, "मला माझ्या फोनचा पासवर्ड आठवत नाही, मी विसरलो आहे. मी घाबरलो आहे." दिल्लीपोलिसांनी त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल आणि एक आयपॅड जप्त केले आहेत, जे आता तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये पाठवण्यात आले आहेत. या उपकरणांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवलेल्या मेसेजचे, कॉल डिटेल्सचे आणि चॅटचे सर्व पुरावे आहेत.
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
४० दिवसांत बदलली १३ हॉटेल्स
तपासात असं दिसून आलं की, चैतन्यनंदने जवळपास ४० दिवसांच्या कालावधीत १३ वेगवेगळी हॉटेल्स बदलली. त्यापैकी बहुतेक वृंदावन, मथुरा आणि आग्रा येथील होती. महत्त्वाचं म्हणजे तो नेहमीच स्वस्त हॉटेल्स निवडायचा, तसंच ज्या हॉटेल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असं ठिकाण पाहायचा. पोलिसांना त्याची थेट ओळख पटू नये म्हणून त्याच्या शिष्यांकडून अनेकदा हॉटेल बुकिंग केलं जात असे. जेव्हा संशय वाढला तेव्हा तो लगेच हॉटेल्स बदलत असे.
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
दोन पासपोर्टवर वेगवेगळी नावं
पोलिसांचे म्हणणं आहे की पळून गेल्यावर देखील तो त्याच्या संस्थेवर लक्ष ठेवत होता. त्याच्याकडून जप्त केलेल्या फोनवर कॅम्पस आणि वसतिगृहांमधील सीसीटीव्ही फुटेजचा एक्सेस होता. याचाच अर्थ असा की, तो विद्यार्थिनी कधी येतात आणि जातात, कोण काय काम करत आहे यावर लक्ष ठेवू शकत होता. पोलिसांनी त्याच्याकडून दोन पासपोर्ट जप्त केले, त्यापैकी एकावर नाव पार्थ सारथी असं होतं. तर दुसऱ्यावर चैतन्यनंद सरस्वती आहे. केवळ नावच नाही तर आई-वडील आणि जन्मस्थान देखील वेगळं होतं.