Shraddha Murder Case : "ते ऐकून मी खाली कोसळलो, आफताबला फाशी द्या"; श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 01:11 PM2022-11-17T13:11:20+5:302022-11-17T13:14:15+5:30

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपी आफताबचा कबुली जबाब ऐकणं आपल्यासाठी फार अवघड असल्याचं म्हटलं आहे.

i collapsed shraddha father said on aftab confession said he should only be sentenced to death | Shraddha Murder Case : "ते ऐकून मी खाली कोसळलो, आफताबला फाशी द्या"; श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Shraddha Murder Case : "ते ऐकून मी खाली कोसळलो, आफताबला फाशी द्या"; श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

googlenewsNext

‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 

श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपी आफताबचा कबुली जबाब ऐकणं आपल्यासाठी फार अवघड असल्याचं म्हटलं आहे. मी स्तब्ध झालो होतो. घटनेचा सगळा तपशील ऐकणं माझ्यासाठी फार कठीण असल्याचं सांगितलं. तसेच आफताबला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. NDTV च्या एका रिपोर्टनुसार, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी "त्याने माझ्यासमोरच कबुली जबाब दिला. पोलिसांना त्याला तू यांना ओळखतो का?’ अशी विचारणा केली. यावर त्याने हे श्रद्धाचे वडील आहेत असं सांगितलं. यानंतर त्याने श्रद्धा आता जिवंत नसल्याची माहिती देत घटनाक्रम सांगितला आणि मी तिथेच खाली कोसळलो. मला ते ऐकवलं जात नव्हतं. यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला नेलं. मी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतो" असं सांगितलं आहे.

Instagram ID पासून ते धर्मापर्यंत...; श्रद्धा अन् आफताबबद्दल गुगलवर काय-काय सर्च केलं जातंय पाहा...

पोलिसांनीही जेव्हा श्रद्धाचं काय झालं आहे सांगितलं, तेव्हाही आपला विश्वास बसत नव्हता असं ते म्हणाले आहेत. "मी स्तब्ध झालो होतो. घटनेचा सगळा तपशील ऐकणं माझ्यासाठी फार कठीण होतं. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचा अनुभवही भयानक होता" असं म्हटलं आहे. "तुम्ही अडीच वर्षांपासून एकत्र राहत असताना तू मला आधीच का सांगितलं नाहीस. मला तिच्या मित्रांकडून ती बेपत्ता असल्याचं कळलं. यावर त्याने आम्ही नात्यात नसताना तुम्हाला कशाला कळवायचं असं उत्तर दिलं" अशी माहिती त्यांनी दिली आहे.

"आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण...."; शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

"तेव्हाच मला काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाली. मी पोलिसांना तो खोटं बोलत असल्याचं सांगितलं. जर त्यांचं प्रेम होतं तर मग तिची काळजी घेणं ही त्याचीच जबाबदारी होती. तो ही जबाबदारी झटकू शकत नाही" असं ते म्हणाले. श्रद्धा आणि आफताबच्या प्रेमप्रकरणामुळेच आपण त्यांच्याशी बोलत नव्हतो असं त्यांनी सांगितलं आहे. “2020 मध्ये माझी त्याच्याशी ओळख झाली. मी त्यावेळी श्रद्धाला त्याच्याशी लग्न करू नको असं सांगितलं होतं. तू आपल्या समाजातील मुलाशी लग्न करावंसं अशी माझी इच्छा असल्याचं मी तिला म्हटलं होतं" असं त्यांनी सांगितलं. आफताबला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

निर्दयी! श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल

आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे.
 

Web Title: i collapsed shraddha father said on aftab confession said he should only be sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.