संतापजनक! हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटण करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 22:13 IST2019-12-02T22:11:18+5:302019-12-02T22:13:29+5:30
या आरोपींना मटण करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.

संतापजनक! हैदराबाद बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपींना तुरुंगात मटण करी
हैदराबाद - देशात खळबळ माजवणारी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुले संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात मात्र खाण्यासाठी मटन करी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींना मटण करी देण्याची गरज काय होती? असा प्रश्न संतप्त लोकांकडून विचारला जात आहे.
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादच्या चेरापल्ली येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या चारही आरोपींना दुपारच्या जेवणात डाळ-भात देण्यात आला. तर रात्रीच्यावेळी त्यांना मटण करी आणि भात देण्यात आला. या चारही आरोपींची पहिली रात्र तुरुंगात झोपेविनाच गेली असल्याची माहिती मिळत असून या चौघांवरही पोलिसांची तुरुंगात करडी नजर आहे.