हैदराबादमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीने तिचा बॉयफ्रेंड आणि आईच्या मदतीने आपल्या वडिलांची हत्या केली कारण ते तिच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध करत होते. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
४५ वर्षीय वडलुरु लिंगम, एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांची पत्नी शारदा (४०) जीएचएमसीमध्ये स्वीपर होती. मुलगी मनिषा (२५) विवाहित होती, पण ती तिच्या पतीपासून वेगळी राहते. तिचे जावेद (२४) नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मनिषा तिच्या बॉयफ्रेंडसोबत भाड्याच्या घरात राहत होती. वडील मुलीचं हे वागणं अजिबात आवडलं नाही, ज्यामुळे ते तिच्याशी अनेकदा भांडत असत.
शारदाने मनिषाला सांगितलं की, नवरा तिच्यावरही संशय घेतो आणि तिला त्रास देतो. यामुळे संतप्त होऊन मनिषाने तिच्या वडिलांना संपवण्याचा भयंकर कट रचला. ५ जुलै रोजी शारदाने लिंगमला दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. यानंतर मनीषा, जावेद आणि शारदा यांनी मिळून उशीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.
मनीषा यानंतर तिचा बॉयफ्रेंड जावेदसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली. चित्रपट संपल्यानंतर त्यांनी लिंगमचा मृतदे येदुलाबाद गावातील एका तलावात फेकून दिला. ७ जुलै रोजी तलावात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तो मृतदेह लिंगमचा असल्याचं समोर आलं. कुटुंबातील सदस्यांची उत्तर ऐकून पोलिसांना संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्याच्या आधारे मनीषा, जावेद आणि शारदा यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान मनीषाने वडिलांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.