नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:53 IST2025-08-07T11:53:27+5:302025-08-07T11:53:59+5:30
एका महिलेने लग्नानंतर आपल्या पतीचा विश्वासघात केला. पती घरी नसताना ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
कानपूरच्या शिवराजपूर परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नानंतर आपल्या पतीचा विश्वासघात केला. पती घरी नसताना ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने कपाटातील तब्बल १५ लाखांच्या दागिन्यांवरही डल्ला मारला आणि तिच्यासोबत लहान मुलालाही घेऊन गेली आहे.
कानपूरच्या शिवराजपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील ही घटना आहे. अजय सिंह एका खासगी कंपनीत काम करतो. श्रावण महिन्यात तो खेरेश्वर घाटावर गंगास्नान करण्यासाठी घराबाहेर पडला. त्याची पत्नी संगीता सिंह आणि त्याचा एकुलता एक मुलगा घरी होते. पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
घराचा दरवाजा बंद होता. शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता, त्याची पत्नी एका तरुणासोबत गाडीने कुठेतरी गेली असल्याचं समजलं. काही अनुचित घडण्याची भीती बाळगून काळजीत असलेल्या अजयने कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला. त्याने पाहिले की, कपाट उघडं होतं आणि आत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम गायब होती. अजयने सांगितलं की, त्याच्या पत्नीचे दीपक कटियार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.
परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कामावर गेल्यावर दीपक अनेकदा त्यांच्या घरी येत असे आणि संगीतासोबत वेळ घालवत असे. बऱ्याचदा दोघेही बाजारात फिरताना दिसले होते. जेव्हा अजयने गंगास्नानासाठी गेला. तेव्हाच संगीताने पळ काढला. संगीता संधीचा फायदा घेत तिचा प्रियकर दीपकसोबत घरात ठेवलेले मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि मुलाला घेऊन पळून गेली.