पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले पतीला अन् पायाखालची सरकली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:28 PM2022-01-02T21:28:28+5:302022-01-02T21:29:07+5:30

Crime News : यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याचा तपास सुरू आहे. 

The husband saw the fan hanging and she got shocked | पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले पतीला अन् पायाखालची सरकली जमीन

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले पतीला अन् पायाखालची सरकली जमीन

Next

पाटना - बेगूसरायच्या विष्णूपूर परिसरात नववर्षानिमित्ताने रात्री उशिरापर्यंत दारू पार्टी सुरू होती. पार्टीनंतर 34 वर्षीय तरुण प्रभाकर झा याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्याचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. हे पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याचा तपास सुरू आहे. 

मृत तरुणाच्या गळ्यावर खूण दिसत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत नक्की काय ते याबाबत खुलासा होईल. खोलीच्या गेटजवळच्या कचऱ्याच्या डब्यात दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. मृत व्यक्तीची पत्नी दिव्या कुमारीने पोलिसांना सांगितलं की, नववर्षानिमित्ताने त्याच्या पतीच्या खोलीत पार्टी करण्यासाठी आजूबाजूचे तीन ते चार मुलं दारू पिण्यासाठी आले होते. दारू पार्टी सुरू असल्याने मी दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारच्या झोपायला गेले. पहाटे तीन वाजता तिला जाग आली. त्यानंतर ती पतीच्या खोलीत गेली. यावेळी तिने पतीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पहिले. हे पाहून पत्नीला जोरदार धक्का बसला. 

Web Title: The husband saw the fan hanging and she got shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.