नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवले; लग्नानंतर पत्नीने गाठले पोलीस ठाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 20:06 IST2020-10-29T20:05:39+5:302020-10-29T20:06:07+5:30
Crime News: टक्कल लपवण्यासाठी केसांचा विग वापरत आहे. त्या वरून फसवणूक झाल्याचे सांगत खटके उडू लागले.

नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवले; लग्नानंतर पत्नीने गाठले पोलीस ठाणे
मीरारोड : नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवण्यासह हुंड्यासाठी त्रास देत असल्याचा नवविवाहितेच्या तक्रारी वरून मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी पती विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोडच्या नयानगर भागातील लक्ष्मीपार्कमध्ये राहणाऱ्या मोहमद मूर्तजा सय्यद (२९) ह्याचा १ महिन्या पूर्वी २७ वर्षीय तरुणी सोबत विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर पत्नीला समजले कि, तिच्या पतीस टक्कल असून तो टक्कल लपवण्यासाठी केसांचा विग वापरत आहे. त्या वरून फसवणूक झाल्याचे सांगत खटके उडू लागले. तर मोहंमद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि तिचा मोबाईल सुद्धा त्याने पाळतीवर ठेवला. त्यातच सासरची मंडळी हुंडा कमी दिला म्हणून त्रास देऊ लागली.
ह्या सर्व त्रासाला व फसवणुकीला कंटाळून महिलेने नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . तिच्या फिर्यादी वरून पोलिसांनी पती आदी विरुद्ध विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत .