शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:09 IST

पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर पत्नीला घेऊन पती हरिद्वारहून खासगी वाहनाने परतत होता. मात्र अचानक रस्त्यात पतीच्या छातीत दुखू लागलं. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी रस्ता रोखला. भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी भरपाईची मागणी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

आग्रा येथील बरहान पोलीस स्टेशन परिसरातील गावात राहणाऱ्या एका गावकऱ्याची ३८ वर्षीय पत्नी ८ जून रोजी तिच्या २४ वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. कुटुंबाने सांगितलं की दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. १२ जून रोजी पतीने बरहान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हरिद्वारमध्ये दोघांचं लोकेशन सापडलं. ही माहिती मिळताच पती पोलिसांसह तेथे पोहोचला. पोलीस हरिद्वारहून एका खासगी वाहनातून महिलेला घेऊन परतत होते. तेव्हाच धक्कादायक घटना घडली.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचं २५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. कुटुंब शेती आणि मजुरीवर अवलंबून आहे. पत्नीचे त्याच्या भाच्याशी प्रेमसंबंध होते. ती बॉयफ्रेंडसोबत घरातून पळून गेली. यामुळे पती खूप दुःखी होता. तो हरिद्वारला खासगी वाहनाने गेला होता. त्याच्यासोबत एक पोलीस आणि एक महिला कॉन्स्टेबल होती. हरिद्वारला छापा टाकण्यासाठी पोलीस आल्याचं पाहून बॉयफ्रेंड घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पत्नीला ताब्यात घेण्यात आलं.

भारतीय किसान युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखला. माहिती मिळताच एसडीएम, एसीपी एतमादपूर, तहसीलदार आणि इतर उच्च अधिकारी तेथे पोहोचले. भारतीय किसान युनियनचे विपिन यादव म्हणाले की, कुटुंबातील तो एकमेव कमावता होता. त्याला तीन मुलं आहेत. आता मुलांची जबाबदारी कोण घेणार?  आंदोलकांनी मृताच्या कुटुंबासाठी भरपाईची मागणी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHeart Attackहृदयविकाराचा झटका