भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:09 IST2025-07-14T17:09:27+5:302025-07-14T17:09:54+5:30
पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर पत्नीला घेऊन पती हरिद्वारहून खासगी वाहनाने परतत होता. मात्र अचानक रस्त्यात पतीच्या छातीत दुखू लागलं. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेलं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी रस्ता रोखला. भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी भरपाईची मागणी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.
आग्रा येथील बरहान पोलीस स्टेशन परिसरातील गावात राहणाऱ्या एका गावकऱ्याची ३८ वर्षीय पत्नी ८ जून रोजी तिच्या २४ वर्षीय भाच्यासोबत पळून गेली होती. कुटुंबाने सांगितलं की दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. १२ जून रोजी पतीने बरहान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हरिद्वारमध्ये दोघांचं लोकेशन सापडलं. ही माहिती मिळताच पती पोलिसांसह तेथे पोहोचला. पोलीस हरिद्वारहून एका खासगी वाहनातून महिलेला घेऊन परतत होते. तेव्हाच धक्कादायक घटना घडली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचं २५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. कुटुंब शेती आणि मजुरीवर अवलंबून आहे. पत्नीचे त्याच्या भाच्याशी प्रेमसंबंध होते. ती बॉयफ्रेंडसोबत घरातून पळून गेली. यामुळे पती खूप दुःखी होता. तो हरिद्वारला खासगी वाहनाने गेला होता. त्याच्यासोबत एक पोलीस आणि एक महिला कॉन्स्टेबल होती. हरिद्वारला छापा टाकण्यासाठी पोलीस आल्याचं पाहून बॉयफ्रेंड घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर पत्नीला ताब्यात घेण्यात आलं.
भारतीय किसान युनियनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखला. माहिती मिळताच एसडीएम, एसीपी एतमादपूर, तहसीलदार आणि इतर उच्च अधिकारी तेथे पोहोचले. भारतीय किसान युनियनचे विपिन यादव म्हणाले की, कुटुंबातील तो एकमेव कमावता होता. त्याला तीन मुलं आहेत. आता मुलांची जबाबदारी कोण घेणार? आंदोलकांनी मृताच्या कुटुंबासाठी भरपाईची मागणी केली.