शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 09:07 PM2021-05-10T21:07:53+5:302021-05-10T21:16:55+5:30

Murder Case : मन हेलावणारे हे हृदयद्रावक दृश्य बघून घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसाचे मन ही काही काळ सुन्न झाले होते.

Husband commits murder after wife refuses to have sexual relation; kid was asleep with her mother's body covered in blood | शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला

शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या तावडीत सापडू नये.यासाठी त्याने त्याचा नेहमीच्या वापरातील मोबाईल नंबर बंद करुन ठेवला होता.

कुमार बडदे

मुंब्राः शारीरिक संबधास पत्नीने नकार दिला म्हणून तीची हत्या करुन उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्ना मध्ये असलेल्या आरोपीला शिळ-डायघर पोलिसांनी अंत्यत शिताफीने चार तासांमध्ये अटक केली.ती या जगात नाही.यापासून अनभिज्ञ असलेला तीचा दोन वर्षाचा चिमुकला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीच्या अंगावर रडत झोपला असल्याचे मन हेलावणारे हे हृदयद्रावक दृश्य बघून घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसाचे मन ही काही काळ सुन्न झाले होते.

अनेक विवाह केलेल्या शान खान उर्फ बाबू याची एक पत्नी तीच्या दोन वर्षाच्या चिमुकल्यासह डायघर गावातील माऊली अपार्टमेंन्ट मध्ये रहात होती.तीच्याकडे कधीतरी येणारा बाबू शनिवारी रात्री तीच्याकडे गेला होता.त्यावेळी दोघांमध्ये शारीरिक संबधा वरुन वादावादी झाली होती.तसेच तीचे दुस-याशी संबध असल्याचा त्याला संशय होता.यामुळे संतप्त होऊन त्याने रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रथम तीच्या डोक्यावर चिणीमातीच्या पोळपाटाने प्रहार केला आणि नंतर तीचे डोके उंबरठ्यावर आपटून तीची हत्या केली.यानंतर शांतपणे त्याने घराला बाहेरून कढी लावली आणि तो पसार झाला.

पोलिसांच्या तावडीत सापडू नये.यासाठी त्याने त्याचा नेहमीच्या वापरातील मोबाईल नंबर बंद करुन ठेवला होता. तो त्याच्याकडे असलेल्या दुस-या मोबाईल नंबर वरुन काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मागावर असलेल्या पथकातील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप सरफरे आणि भुषण कापडणिस आदींच्या निर्दशनास येताच मोबाईल लोकेशनची पडताळणी करुन एक पथक दादर रेल्वे स्थानकावर गेले.तेथे पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान त्याने हत्या कोणत्या कारणासाठी केली.याची कबुली दिली आसल्याची माहिती शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी लोकमतला दिली.

Web Title: Husband commits murder after wife refuses to have sexual relation; kid was asleep with her mother's body covered in blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app