पत्नीवर वार करुन पतीचा १५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:51 IST2019-06-28T14:36:22+5:302019-06-28T14:51:49+5:30
महंमदवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर वार केले...

पत्नीवर वार करुन पतीचा १५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
पुणे: पुण्यातील महंमदवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. वार केल्यानंतर पतीने १५व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली..सुभाषचंद्र अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील पेबल पार्क येथे राहणाऱ्या सुभाषचंद्र अग्रवाल यांनी आपल्या पत्नीवर करुन १५ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. या हल्ल्यात पत्नी रेखा अग्रवाल ह्या गंभीर जखमी झाल्या असून उपचारासाठी त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वानवडी पोलीस घटनेचा पुुढील तपास करत आहे.