पतीने 6 हजार रुपये मागितले; पत्नीने गळा दाबून मारलं आणि घरातच गाडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 16:41 IST2023-02-03T16:41:32+5:302023-02-03T16:41:46+5:30

अवघ्या 6 हजार रुपयांसाठी पती-पत्नीत टोकाचा वाद झाला.

husband asked for 6 thousand rupees; wife strangled him and buried him in the house... | पतीने 6 हजार रुपये मागितले; पत्नीने गळा दाबून मारलं आणि घरातच गाडलं...

पतीने 6 हजार रुपये मागितले; पत्नीने गळा दाबून मारलं आणि घरातच गाडलं...


कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बिधानू पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये अवघ्या 6 हजारांवरून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर हत्येनंतर पत्नीने पतीचा मृतदेह खोलीतच बेडखाली गाडला आणि रात्रभर बेडवर आरामात झोपली. 

उमेश असे मृत पतीचे नाव असून, पोलिसांनी पत्नी मोनिकाला अट केली आहे. चौकशीदरम्यान मोनिकाने पोलिसांची खूप दिशाभूल केली, पोलिसांनी कसून चौकशी करताच मोनिकाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यादव यांची पत्नी मोनिकाने घरी पाळलेली म्हैस 6 हजारांना विकली होती. यानंतर उमेशने मोनिकाकडे पैसे मागितले असता, दोघांमध्ये वाद झाला. 

मंगळवारी सायंकाळी वाद झाला आणि तेव्हापासून उमेश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घाटमपूर पोलिस आले आणि तपास सुरू केला. यानंतर पत्नीने उमेशचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू केली आहे. 

Web Title: husband asked for 6 thousand rupees; wife strangled him and buried him in the house...